agriculture news in marathi agrowon agralekh on delay for declaration of kharif crops MSP by central government | Page 2 ||| Agrowon

खरीप पिकांचे  हमीभाव कधी कळणार? 

विजय सुकळकर
सोमवार, 31 मे 2021

हमीभावात चांगली वाढ करून ठरलेल्या दरात शेतीमाल खरेदीची हमी शेतकऱ्यांना मिळायला हवी. असे झाले तर देशातील तमाम शेतकरी वर्गाची क्रयशक्ती वाढेल. 

कोणत्याही कंपनी उत्पादनांचे दर उत्पादनासाठीचा पूर्ण खर्च, ग्रेडिंग, पॅकिंग, वाहतूक, विक्री, शासनाचे विविध कर, मूळ गुंतवणूक तसेच खेळत्या भांडवलावरील व्याज, घरच्या-बाहेरच्या मजुरांची मजुरी असा संपूर्ण खर्च आणि त्यावर ५० टक्क्यांपर्यंतचा नफा (काही उत्पादनांत यापेक्षा अधिक) गृहीत धरून ठरविले जातात. असे दर ठरविण्याचा अधिकार उत्पादकांनाच असतो. शेती व्यवसायाचे मात्र याच्या उलट आहे. शेतीमाल उत्पादनाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही. खरीप, रब्बी हंगामातील हमीभावाच्या कक्षेतील नगदी पिके, अन्नधान्य पिकांचा भाव केंद्र सरकार जाहीर करते. असे हमीभाव जाहीर करताना शेतीमालाचा संपूर्ण उत्पादन खर्चदेखील लक्षात घेतला जात नाही. जाहीर केलेल्या अशा कमी भावाचा बाजारात आधार मिळत नाही. हंगाम कोणताही असो शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात यायला सुरुवात झाली की दर पडतात. शेतीमालास हमीभावाचा आधार देण्यासाठी बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याच्यावर हमीभाव देण्याचे कायद्याने बंधन आहे. परंतु ‘एफएक्यू’च्या नावाखाली बहुतांश शेतीमालास हमीभावापेक्षा कमी भावातच त्याची खरेदी केली जाते. अधिक गंभीर बाब म्हणजे पेरणी करताना सुद्धा उत्पादित शेतीमालास दर काय असेल, याची माहिती शेतकऱ्यांना नसते. या वर्षी चांगल्या आणि वेळेवर पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांचे खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन झाले आहे. असे असताना अजूनही खरीप पिकांचे हमीभाव मात्र जाहीर झालेले नाहीत. देशभरातील शेतकऱ्यांना हमीभावाची प्रतीक्षा असून, शेतकरी संघटनेने तर हंगाम आटोपल्यावर हमीभाव जाहीर करणार का, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. 

शेतकरी आपल्याकडील उपलब्ध शेती क्षेत्र, जमिनीचा प्रकार, पाण्याची सोय, इतर संसाधने तसेच पडणारे पाऊसमान यानुसार पिकांचे नियोजन करीत असतो. शेतीमालास बाजारपेठ कुठे मिळेल तसेच त्यास दर काय मिळतील, याचाही विचार पिकांची लागवड, पेरणी करताना केलेला असतोच. आजकाल तर शेती अधिक भांडवली आणि व्यावसायिक झाली आहे. अशावेळी उत्पादित शेतीमालास दर काय असेल, याची माहिती शेतकऱ्यांना हवीच आहे. हंगामपूर्व खरीप लागवडीला देशभर सुरुवात झाली, तरी अजूनही हमीभाव मात्र जाहीर झाले नसल्यामुळे तृणधान्यावर भर द्यायचा, की कडधान्याची अधिक क्षेत्रावर लागवड करायची, की नगदी पिकांचा पेरा वाढवायचा, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे. पिकांची लागवड अथवा पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना हमीभाव कळाले तर शेती पिकांचे नियोजन अधिक काटेकोरपणे करता येते. ज्या शेतीमालास अधिक भाव असेल त्याच्या लागवडीवर शेतकऱ्यांना भर देता येऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव तत्काळ जाहीर करावेत.

मागील अनेक वर्षांपासून हमीभावात अपेक्षित वाढ झालेली नाही. या वेळी तर कोरोनाचा संसर्गामुळे आरोग्यावर झालेला शेतकऱ्यांचा खर्च, लॉकडाउनमुळे शेतीमाल विक्रीत येत असलेल्या अडचणी, शेतीमालास मिळालेले अत्यंत कमी दर, आवश्यक वस्तू-उत्पादनांचे वाढलेले दर आदी कारणांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आरोग्य आणीबाणी काळ आणि अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीतही मागील वर्षभरापासून शेतकरी शेतीमालाचे उत्पादन घेऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची पूर्ण खबरदारी घेत आहे. अशावेळी तरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालास हमीभाव जाहीर करायला हवेत. हमीभावात चांगली वाढ करून ठरलेल्या दरात शेतीमाल खरेदीची हमी शेतकऱ्यांना मिळायला हवी. असे झाले तर देशातील तमाम शेतकऱ्यांची (एका मोठ्या ग्राहकवर्गाची) क्रयशक्ती वाढेल. लॉकडाउनमुळे आलेल्या बाजारातील मंदीत हळूहळू तेजी येईल. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येण्यास हातभार लागेल. 
.............. 


इतर संपादकीय
सुधारणांना वाव द्यामहाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा...
कौशल्य अन् आत्मविश्‍वास वाढविणारे हवे...सध्या राज्यात चार कृषी विद्यापीठे, एक पशू व...
लोणार ते लंडन प्रेरणादायी प्रवासपूर्वी नोकरी करायची असेल तरच शिक्षण घेतले पाहिजे...
कृषी शिक्षणाचा पायाच डळमळीत महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी नुसार राज्याचे सकल...
क्लस्टरद्वारेच वाढेल मोसंबीचा गोडवागेल्याकाही वर्षांपासून राज्यात मोसंबीची लागवड...
शेतकऱ्यांची समृद्धी हाच ध्यासमहाराष्ट्र राज्याला ज्यांचे प्रदीर्घ नेतृत्व...
कृषी कर्जपुरवठा दावे अन् वास्तवमहाराष्ट्रात दीड कोटी शेतकरी आहेत. त्यांपैकी...
आकडेवारीचा खेळ अन्‌ नियोजनाचा मेळआज देशातील, राज्यातील सर्व शासकीय, खाजगी आस्थापना...
वास्तव जाणून करा उपायगेल्यावर्षी कपाशी, सोयाबीनची लागवड केली होती....
अजेंड्याच्या चौकटीतील संवादजम्मू-काश्‍मीरस्थित राजकीय पक्ष, त्यांचे नेते...
अडचणीतील शेतकऱ्यांचा ‘मित्र’या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसावर राज्यात...
बाजार समित्या  नेमक्या कोणासाठी? पंधरा ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला...
समुद्रातील ‘अद्‍भुत खजिना’ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर असलेल्या...
दुग्धव्यवसायातील लूटमार थांबवा कोविड - १९ चे दुसरे लॉकडाउन सुरू झाले आणि मागणी...
एचटीबीटी’चे भिजत घोंगडे .  बेकायदेशीर एचटीबीटी (तणनाशक सहनशील बीटी...
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
अन्नप्रक्रियेतील वित्तीय अडथळेपीककर्ज, पीकविम्यासह शेतीसंबंधात इतरही अनेक कर्ज-...
मृद्‍गंध हरवत चाललाय!यावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात...
शेतकरी आजही पारतंत्र्यातच! १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि...
करार ठरावा ‘स्मार्ट’ ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...