agriculture news in marathi agrowon agralekh on dryland agriculture | Agrowon

‘कोरडवाहू’चे वैचारिक सिंचन

विजय सुकळकर
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

भौगोलिक परिस्थितीनुसार पाण्याचे विविध 
स्रोत शोधून अथवा निर्माण करून त्यातून सामूहिक संरक्षित सिंचनावर काम व्हायला पाहिजे. आणि हे शासनाच्या पुढाकाराशिवाय शक्य नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे.

कोरडवाहू (जिरायती) शेती समस्यांबाबत दोन दिवसांचे चर्चासत्र 
 औरंगाबाद येथे नुकतेच पार पडले. कोरडवाहू शेतीसंबंधी विविध घटकांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी यात आपला सहभाग नोंदविला होता. कोरडवाहू शेतीसाठीच्या केंद्र-राज्य शासनाच्या योजना बऱ्याच आहेत. त्यांच्यासाठी पुरेशा निधीची तरतूदही केली जाते. अशा योजनांची अंमलबजावणी होऊन निधी खर्च झाल्याचेही शासन-प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतू कोरडवाहू शेतीचे प्रश्न कायम तर आहेतच, ते अजून भीषण होत चालले आहेत. हे असे का? याचे उत्तर शोधावेच लागणार आहे. औरंगाबाद येथील चर्चासत्रामध्ये कोरडवाहू शेतीसंबंधी विविध घटकांवर तज्ज्ञांचे सादरीकरण झाले. त्यातून पुढे आलेल्या समस्यांची नोंद घेऊन त्यावरील उपाय शोधण्याचा प्रयत्न झाला. या समस्या आणि उपायांचा पुढेही पाठपुरावा सुरूच राहणार असून, या वैचारिक मंथनातून कोरडवाहू शेती विकासाबाबतचे महत्त्वाचे मुद्दे शासन दरबारी मांडण्याचे आयोजकांचे नियोजन दिसते, ही बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल. 

देशात ५४ तर राज्यात ८२ टक्के शेती क्षेत्र कोरडवाहू आहे. देशाची अन्नसुरक्षा खरे तर कोरडवाहू शेतीवरच अवलंबून आहे. या शेतीची अन् शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीचा विकास झाल्याशिवाय शेतीचा विकास झाला, असे म्हणताच येणार नाही. असे असताना कोरडवाहू शेतीच्या अनुषंगाने ज्या मूलभूत सुविधा आपण म्हणतो त्या म्हणजे पाणी, वीज, रस्ता यादेखील बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोचलेल्या नाहीत. बहुतांश कोरडवाहू शेतीतून उत्पादित शेतमालाचे प्रमाण विक्रीयोग्य नसते. त्यातच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यास रस्ता नाही. रस्ता असलेल्या ठिकाणी पावसाळ्यानंतर त्याची अत्यंत दुर्दशा झालेली असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना स्वःत शेतमाल विक्री करा, ऑनलाइन मार्केटिंग करा, असे धडे दिले जातात, हे कितपत योग्य आहे? कोरडवाहू शेतीसाठी नवीन वाणं, पीकपद्धती, प्रगत लागवड तंत्र, कोरडवाहू पिकांच्या संपूर्ण मूल्यसाखळीचा विकास या सुविधा तर शेतकऱ्यांपासून ‘कोसो दूर’ म्हणाव्या लागतील. त्यामुळेच कोरडवाहू शेतीसाठीच्या जुन्या पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच बदलत्या हवामानास अनुकूल वाणं, पीकपद्धती शेतकऱ्यांना मिळाव्यात, अशी मागणी या चर्चासत्रातून पुढे आली आहे. 

सध्याच्या अत्यंत विपरित अशा हवामानाच्या काळात संरक्षित सिंचनाशिवाय कोरडवाहू शेतीतील उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही. संरक्षित सिंचनासाठी आता केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांच्या पातळीवरच विचार केला जातो. त्याऐवजी भौगोलिक परिस्थितीनुसार पाण्याचे विविध स्रोत शोधून अथवा निर्माण करून त्यातून सामूहिक संरक्षित सिंचनावर काम व्हायला पाहिजे. आणि हे शासनाच्या पुढाकाराशिवाय शक्य नाही. आपल्या शेजारील तेलंगणा, आंध्र यांसारखी राज्ये हे करू शकतात, तर मग आपण का नाही?  
शेती कोरडवाहू असो की बागायती, त्यास पशुधनाची जोड आवश्यकच आहे. पशुधनामुळे शेतीची कामे होतात, शेतीला शेणखत मिळते, तसेच शेतकरी कुटुंबाला दूधदुभत्याद्वारे शाश्वत उत्पन्न स्रोत मिळतो. असे असताना सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगात पशुधन कमी झाले आहे. शेतीतील पशुधन कमी होण्यामागचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गावपातळीवरील गायरान जमिनी, चराऊ कुरणे नष्ट झाली आहेत. अशावेळी चाऱ्यासाठी विभाग स्तरावर तृण संशोधन केंद्र, चारायुक्त शिवार अभियान, गवताळ भागातील जैवविविधता टिकविण्यासंदर्भातील चर्चा कोरडवाहू शेतीला वेगळे वळण देऊ शकते. शेतीचे वन्यप्राण्यांद्वारे होणाऱ्या नुकसानीने खरे तर राज्यातील शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. परंतू शासन पातळीवर हा विषय तेवढाच दुर्लक्षित आहे. वन्यप्राण्यांद्वारे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत, त्यात तांत्रिक अनेक अडचणी आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईही मिळत नाही. अशा वेळी वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची पाहणी, पंचनामे, भरपाई मिळण्याची पद्धत सुलभ झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. 



इतर संपादकीय
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
‘अटल योजने’द्वारे शाश्‍वत करूया भूजलजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण...
वेध भविष्यातील शेतीचाआपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश...
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे कार्य कधी?शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या...
निर्यातवृद्धीचा रोडमॅपभारतात प्रदेशनिहाय माती, हवामान बदलते. अनेक...
दुबई वारी फलदायी ठरावी संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे....
उद्योगाप्रमाणे हव्यात शेतीला सवलतीशेती हा एक उद्योग आहे, याची जाणीव करून देण्याची...
गोड बोलण्यासारखी स्थिती नाही!गेल्या सहा वर्षांत भारतात एक नवी ‘भक्त-परंपरा’...