agriculture news in marathi agrowon agralekh on elecion manifestos of political parties | Agrowon

आश्वासनांचा पाऊस

विजय सुकळकर
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

शेतीचा शाश्वत विकास करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबतची दिशा कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात दिसून येत नाही. 

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. प्रचाराच्या शेवटच्या तीन-चार दिवसांत अधिकाधिक मतदारापर्यंत पोचण्याचा सर्वच उमेदवारांसह पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे प्रयत्न चालू आहेत. मागील काही वर्षांपासून निवडणूक कोणतीही असो त्यातील प्रचाराचा दर्जाच खालावल्याचे दिसून येते. खरे तर सत्ताधारी पक्षांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील प्रमुख उपलब्धी जनतेसमोर मांडणे तर विरोधी पक्षांनी राज्याच्या दृष्टीने ज्वलंत प्रश्न, जनतेच्या अडचणी मांडून सरकार या सर्व पातळ्यांवर कसे अपयशी ठरले यावर मत मागणे अपेक्षित असते. परंतु, हे सर्व मुद्दे बाजुलाच राहिले असून, एकमेंकांवरील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपानेच निवडणूक प्रचार गाजत आहे. त्यातच भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. या सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी शेतकरी दिसत असला तरी, नेमक्या त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत अवास्तव आश्वासनांची मुक्त उघळण त्यांच्यावर केली ेगेली आहे. 

सत्ताधारी भाजपच्या संकल्पपत्रात राज्याच्या दुष्काळमुक्तीचा संकल्प केला आहे. हा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे सत्तेत आल्याबरोबर केला होता. त्यासाठी त्यांनी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले होते. मागील चार-पाच वर्षे या अभियानात पाणी नाही तर पैसाच मुरल्‍याचे दिसते. आता दुष्काळमुक्तीसाठी त्यांनी समुद्राला वाहून जाणारे तसेच सांगली, कोल्हापूरला येणाऱ्या महापुराचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याचा निर्धार केला आहे. सरकारची तिजोरी खाली असताना पाणी वळविण्याचे हे महाकाय प्रकल्प अवास्तव आहेत, असे मत अनेक जलतज्ज्ञ व्यक्त करताहेत. तसेच पाच वर्षांत एक कोटी युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या आधारावर १२ तास वीज, सर्वांना पक्के घर, पिण्याचे पाणी, पक्की सडक आणि आरोग्य सेवा पुरविण्यात येतील, असेही त्यांच्या संकल्पपत्रात नमूद असले तरी हे कसे करणार याबाबत स्पष्टता नाही. गंभीर बाब म्हणजे संकल्पपत्रात या सर्व बाबी असल्या तरी त्यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी मात्र ‘३७० कलम’ हाच मुद्दा आहे. अर्थात या मुद्द्याचा राज्यातील जनतेशी तसा थेट काहीही संबंध नाही.

शिवसेनेला आपला वचननामा प्रसिद्ध करताना मागील पाच वर्षांत आपण सत्तेत सहभागी होतो, याचा विसरच पडलेला दिसतो. महाराष्ट्राला उद्योग आणि कृषी हब करण्याचे वचन त्यांनी २०१४ च्या त्यांच्या वचननाम्यात दिले होते. मागील पाच वर्षांत उद्योग आणि शेतीचे कसे वाटोळे झाले, हे सर्वांसमोर आहे. आता पुन्हा ते मराठवाड्यात मका प्रक्रिया, कॉटन हबसाठी प्रयत्न करू असे म्हणतात. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दहा हजार रुपये टाकणार, हमीभाव देणारे धोरण आखणार, पीकविम्यातील त्रुटी दूर करणार, अशा काही प्रमुख बाबी त्यांच्या वचननाम्यात आहेत. खरे तर कर्जमाफीपासून ते पीकविमा योजनेपर्यंत बहुतांश योजनांच्या अंमलबजावणीत युती सरकार सपसेल अपयशी ठरले आहे. राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या हे त्याचे प्रमाण आहे. हे सर्व शिवसेना सत्तेत राहून पाहत असताना त्यांनी पाच वर्षांत काय केले? हा खरा प्रश्न आहे. शिवाय दहा रुपयांत सकस थाळीची घोषणा करताना त्यांच्या झुणका-भाकर योजनेचे काय झाले, हे त्यांनी राज्यातील जनतेला सांगायला हवे होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्यातही सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना मासीक भत्ता, कामगारांना किमान वेतन, स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या, उद्योगधंदे वाढीसाठी विभागनिहाय स्वतंत्र धोरण अशी आश्वासने देऊन सर्वांना खूष करण्याचाच प्रयत्न करण्यात आला आहे. दुष्काळ, महापुराने राज्यातील शेतकरी हैराण आहे. वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. निविष्ठांचा काळाबाजार फोफावतोय. राज्यात विक्री तसेच मूल्यवर्धन साखळी विकसित झाली नसल्याने शेतीमालाची माती होत आहे. केंद्र-राज्य शासनाच्या बहुतांश योजना शेतकऱ्यांना मृगजळ ठरत आहेत. परंतु यावर कोणीही बोलायला तयार नाही. यातून अस्वस्थ वर्तमानातील राज्यातील शेतीचे भवितव्यही अंधकारमयच दिसते. 


इतर संपादकीय
अन्नप्रक्रियेतील वित्तीय अडथळेपीककर्ज, पीकविम्यासह शेतीसंबंधात इतरही अनेक कर्ज-...
मृद्‍गंध हरवत चाललाय!यावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात...
शेतकरी आजही पारतंत्र्यातच! १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि...
करार ठरावा ‘स्मार्ट’ ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...
पेरणी ‘हिरव्या स्वप्नांची’!  मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
तो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने...
बेरोजगारीची लाट थोपवागेल्या वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर...
‘अढी’ला पिकलाय आंबापूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील...
उत्पन्नवाढीसाठी‘हिरवे सोने’  जगामध्ये १९७४ पासून ५ जून हा जागतिक...
इथेनॉलला प्रोत्साहन  सर्वांच्याच हिताचे  केंद्र सरकारने इंधनावरील आपले अवलंबित्व कमी...
समृद्धीचा मार्ग स्वतःच शोधायेत्या खरीप हंगामात चांगला पाऊस पडेल, भरघोस पीक...
तक्रार निवारणाची  योग्य प्रक्रिया  चालू खरीप हंगामात महाराष्ट्रातील ...
‘खतवापर क्रांती’च्या दिशेने एक पाऊल  ‘इफ्को’ने (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-...
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारी धोरणे... ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे थैमान चालू आहे....
तिढा शिल्लक साखरेचा!  दिवाळीनंतर उन्हाळ्यातील लग्नसमारंभ, धार्मिक...
वेगान दूध -  गाईम्हशींच्या दुधाची जागा...‘वेगान’ हा शब्दच मुळात व्हेजिटेरियन (Vegetarian)...
शेती प्रगती अन्  धोरण विसंगती चार दिवसांपूर्वीच केंद्रीय कृषी मंत्रालयाचा २०२०-...
एक पाऊल मुस्कटदाबीच्या दिशेने मोदी-२.० राजवटीला दोन वर्षे पूर्ण झाली. ...
खरीप पिकांचे  हमीभाव कधी कळणार?  कोणत्याही कंपनी उत्पादनांचे दर उत्पादनासाठीचा...