agriculture news in marathi agrowon agralekh on ethanol policies in India | Agrowon

इथेनॉलला प्रोत्साहन  सर्वांच्याच हिताचे 

विजय सुकळकर
शनिवार, 5 जून 2021

भारतात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर केवळ ऊस मळीपासूनच्या इथेनॉलवर विसंबून राहून चालणार नाही. 

केंद्र सरकारने इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट लवकरच गाठायचे ठरविले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य आता २०२३ मध्येच गाठायचे आदेश देण्यात आले आहेत. देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरण्याचे धोरण २००२ मध्ये स्वीकारले गेले. परंतु गरजेनुसार इथेनॉल तयार होत नसल्याने २००६ मध्ये पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणासाठीचे नवे धोरण आणले गेले. असे असले तरी इथेनॉलनिर्मिती आणि वापरास २०१४ पर्यंत गती मिळाली नाही. त्यामुळे मोदी सरकारने २०२२ पर्यंत तरी पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नव्याने धोरण आखणी केली. पुढे २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. हे लक्ष्य आधी २०२५ पर्यंत आणि आता तर २०२३ मध्ये गाठायचे ठरविण्यात आले आहे. 

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवीत असताना आणि हे उद्दिष्ट कमी कालावधीत साध्य करण्यासाठी देशात इथेनॉलनिर्मिती, विक्री, वापर यांस पूरक काही निर्णयदेखील मोदी सरकारने घेतले आहेत. साखर उद्योग तसेच डिस्टिलरीला प्रोत्साहनासाठी आर्थिक लाभाच्या काही योजना देण्यात आल्या. मोलॅसिस, बी हेवी, तसेच थेट उसाच्या रसापासूनचे इथेनॉल असे वर्गीकरण करून त्यानुसार वाढीव दरही जाहीर करण्यात आले आहेत. इथेनॉलनिर्मिती आणि विक्रीसाठी जीएसटी तसेच वाहतुकीतही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे २०१३-१४ मध्ये जेमतेम ३८ कोटी लिटर असलेले इथेनॉल उत्पादन २०३० मध्ये १९५ कोटी लिटरवर पोहोचले. अर्थात, मागील सात वर्षांत इथेनॉल उत्पादनात पाच पटीहून अधिक वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे २०२० मध्ये देशात असलेले १९५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन एकाच वर्षात ३०० कोटी लिटर करण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. असे असले तरी आतापर्यंत आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणात केवळ सात टक्क्यांपर्यंत पोहोचू शकलो आहोत. 

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळायचे धोरण साध्य करायचे असेल, तर जवळपास १००० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. २०२१ मध्ये ३०० कोटी लिटर इथेनॉल आपण करू शकलो, तरी पुढील दीड-दोन वर्षांत तिपटीहून अधिक उत्पादन वाढवावे लागेल. देशातील साखर कारखान्यांनी ३५५ कोटी लिटर निर्मितीची यंत्रणा उभी केली आहे. येत्या काही काळात ही निर्मितीक्षमता ४६६ कोटी लिटरपर्यंत पोहोचेल. महत्त्वाचे म्हणजे देशात उत्पादित सर्व ऊस मळीपासून इथेनॉलनिर्मिती केली, तरी आपण ५०० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनापर्यंत पोहोचू. त्यामुळे उसाचा रस तसेच साखरेपासून इथेनॉलनिर्मिती करावी लागेल. त्याचबरोबर खराब धान्ये, बांबूसारख्या वनस्पती, पिकांचे अवशेष यापासून इथेनॉलनिर्मितीवरही भर द्यावा लागेल. देशात इथेनॉल उत्पादन वाढवीत असताना तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदी होईल, हेही पाहावे लागेल. पेट्रोल कंपन्या आणि इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या कंपन्या यांच्यातील करार दोघांनाही पूरक असतील, असे बनवावे लागतील. अशा करारांचे दोन्ही पार्टीकडून पालन होईल, याची काळजी घ्यावी लागेल. दरम्यानच्या काळात तेल कंपन्यांना इथेनॉल साठवणक्षमता वाढवावी लागेल. देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉलनिर्मिती करणारे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक असे काही राज्येच आहेत. या राज्यांमधून दूरच्या राज्यांत इथेनॉल पाठवायचे म्हणजे वाहतुकीत केवळ सवलत देऊन चालणार नाही, तर पूर्ण वाहतूक खर्च देण्याबाबतही विचार व्हायला हवा. इथेनॉल हे पर्यावरण पूरक इंधन आहे. इथेनॉलनिर्मितीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होती. साखर कारखान्यांचे अर्थचक्र सुधारेल. सरकारचे परकीय चलनही वाचेल. अर्थात, इथेनॉलला प्रोत्साहनातच सर्वांचे हित आहे. 


इतर संपादकीय
भारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल...पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम...
सोयाबीन विक्री करा जरा जपूनचमागील दोन महिन्यांपासून सोयाबीन हे पीक देशभर...
खरे थकबाकीदार ‘सरकार’च  वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली...
देवगड ‘राम्बुतान’हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘...
‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेतीदेशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५...
हतबलतेचा अंत नका पाहूसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर...
दूध आणि ऊस उत्पादकांच्या लुटीचे रहस्यसाखर उद्योग व दुग्ध व्यवसायामध्ये कमालीचे...
शर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजनबैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे ...
रीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...
व्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...
शुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...
वाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...
शुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...
कात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...
घातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...
ऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...
‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...
दिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
अन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...
शेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...