agriculture news in marathi agrowon agralekh on kharif sowing in Maharashtra state | Page 2 ||| Agrowon

पेरणी ‘हिरव्या स्वप्नांची’! 

विजय सुकळकर
गुरुवार, 17 जून 2021

खरीप हंगामात पेरणी करताना जमिनीत किती ओल आहे आणि वर आकाशात किती ढग आहेत, याचा अंदाज घेऊन शेतकरी पेरणीला लागतो. 

मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यापूर्वी देखील तौक्ते आणि यास चक्रीवादळामुळे राज्याच्या बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे मृग नक्षत्राच्या पावसाने जमिनीत बऱ्यापैकी ओल झालेली आहे. असे असले तरी राज्याचा पूर्व भाग, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत पावसाची उघडीप आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून मॉन्सूनला फारसे पोषक वातावरण नसल्याने त्याचा वेग थोडा मंदावला आहे. त्यामुळे ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड पडल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे पेरणीची घाई करू नये, असे कृषी विभाग सांगून मोकळे झाले असले तरी शेतकऱ्यांनी पेरणी नक्की कधी करायची, हा खरा प्रश्‍न आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हवामान शास्त्र विभागाचे वेदर स्टेशन्स हे महसूल मंडळाच्या ठिकाणी आहेत. त्यातीलही बहुतांश स्टेशन्समध्ये पावसाची नोंद नीट होत नाही. त्यातच मागील काही वर्षांपासून गावात पाऊस असेल, तर शेतात नसतो अन् शेतात असेल तर गावात नसतो. अशावेळी गावोगावच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतशिवारात ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाला की नाही, हे शेतकऱ्यांना कोण आणि कसे सांगणार, हाही प्रश्‍न आहे. 

पेरनीला येळ नगं, चला चला रे गड्यानू 
फाटं आजा गचकला, पन ठिवा झाकून मयत 

पेरणीच्या काळात घरात कुणी मरण पावले तरी मढ झाकून पेरणी केली पाहिजे, असे शेतकऱ्यांमध्ये बोलले जाते. कवयित्री सुरेखा शहा यांच्या ‘पेरनी’ कवितेतील या ओळी तेच सांगतात. महत्त्वाचे म्हणजे नेमकी कधी पेरणी करायची, यासाठी तो कुणाच्या सल्ल्याची वाट पाहत बसत नाही. पेरणी करताना जमिनीत किती ओल आहे आणि वर आकाशात किती ढग आहेत, याचा अंदाज घेऊन तो पेरणीला लागतो. त्यामुळेच मृगाच्या चांगला पाऊस ज्या भागात झाला तेथे खरीप पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. दिवसभर पेरणी केल्यावर संध्याकाळी जेव्हा रिमझिम पाऊस बरसतो तेव्हा पेर साधल्याचा आनंद केवळ शेतकरी अन् शेतकरीच अनुभवू शकतो. 
 

बीज मातीत पेरता, खाण सोन्याची त्या भासें 
रोप रोप लावताना, चिखलाची उटी माखे 

खरे तर शेतात कुठल्याही पिकांचे बीज नाही तर ‘हिरवं स्वप्न’ शेतकरी पेरत असतो. परंतु त्याचं हे हिरवं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी कुणाचीच साथ त्यास मिळताना दिसत नाही. देशभरासाठी १०१ टक्का पावसाचा अंदाज सांगणारे भारतीय हवामानशास्त्र विभाग नेमके पावसाचे खंड कुठे, कसे पडणार? अतिवृष्टी कुठे, कधी होणार हे सांगत नाही. त्यामुळे पाऊसमान चांगले असो की नसो, राज्याच्या काही भागांत काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट दरवर्षीच येते. कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, खासगी निविष्ठा कंपन्या यांची जबाबदारी शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा तसेच उच्च तंत्रज्ञान पुरविण्याची आहे. परंतु निविष्ठांचा दर्जा आणि प्रगत लागवड तंत्राच्या अवलंबाबाबत काय परिस्थिती आहे, हे आपण सर्व जण जाणून आहोत. पीक उगवून आले तरी अतिवृष्टी, पावसाचा खंड कीड-रोगांचे आक्रमण, तणांचा प्रादुर्भाव असे हल्ले त्यावर चालूच असतात. यातून हाती आलेले उत्पादन विक्रीस नेले तर बाजारातील सर्वच घटकांकडून त्याची लूट होते. या सर्व दुष्टचक्रात शेतकऱ्यांनी पाहिलेले हिरवे स्वप्न मात्र विरून जाते. चला तर शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकार करण्याचा संकल्प सर्व जण करूया! 


इतर संपादकीय
इथेनॉलयुक्त भारतातूनच साधेल इंधन...भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस...
डीबीटी’ लाभदायकच!  कृषी विभागांतर्गतच्या विविध योजनांचा एक हजार...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
दिलासादायक दरवाढखरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपनशर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते...
बैलगाडा शर्यत ः ग्रामीण अर्थकारणाचे साधनबैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे....
‘सिट्रस इस्टेट’ला गतिमान करा विदर्भातील संत्रा या फळपिकाची उत्पादकता वाढवून...
जीवदान अन् दाणादाणहीयावर्षी जूनमध्ये ऐन पेरणीच्या हंगामातील पावसाचा...
स्वतंत्र सिंचन यंत्रणेची करा निर्मितीपंतप्रधान कृषी सिंचन योजना देशातील अनेक राज्यांत...
घटता सहभाग चिंता वाढविणारापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी...
अनुदानात अडकले सूक्ष्म सिंचनाचे थेंब ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापरून कमी पाण्यात...
हिरव्या ऋतूत पाण्याची वानवायावर्षी देशपातळीवर सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या...
तीन दशके आर्थिक उदारीकरणाची!वामनाने तीन पावलांत बळीराजाला पाताळात ...
शांतता, संसदेत गोंधळ सुरू आहे!अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्याने...
एफआरपी ः दूधदरावर कायमस्वरूपी तोडगाखरे तर मागील दशकभरापासून राज्यातील दुग्ध व्यवसाय...
अडचणीत वाढ अन् लुटीला प्रोत्साहनआधीच शेतकऱ्यांवर प्रचंड निर्बंध लादलेले असताना...
अवजारांची उपयुक्तता अन् दर्जा कसून...मागील दीड-दोन दशकांमध्ये देशात, राज्यात...
असा आदर्शवादी नेता पुन्हा होणे नाहीगणपतराव देशमुख ३० जुलै २०२१ ला आपल्यातून निघून...
आव्हान पाण्याच्या अन् चिखलाच्या पुराचेकोकणात २२ जुलै २०२१ या दिवशी ६३० मि.मी. एवढा...
जीवनमरणाचा प्रश्‍न निकाली काढामागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या चांगल्या...