agriculture news in marathi agrowon agralekh on less sowing of crops in kharip due to poor economic conditions of farmers | Page 2 ||| Agrowon

वास्तव जाणून करा उपाय

विजय सुकळकर
मंगळवार, 29 जून 2021

सर्व बाजूंनी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्यामुळे पेरणीचा टक्का कमी दिसत आहे. ही बाब गंभीरतेने घेऊन त्यांना पेरणीसाठी तत्काळ आर्थिक मदत कशी करता येईल, हे पाहायला हवे.
 

गेल्यावर्षी कपाशी, सोयाबीनची लागवड केली होती. मात्र उत्पादन काहीच झाले नाही. त्यामुळे यंदा पैशाअभावी सात एकर क्षेत्र पडीक ठेवले आहे. ही प्रतिक्रिया आहे यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरखर्डा येथील सय्यद युसूफ अली या शेतकऱ्याची! तर अमरावती जिल्ह्यातील विजय देशमुख म्हणतात, दरवर्षी २६० एकर शेती करारावर करतो. गेल्यावर्षीच्या हंगामांत शेती खर्चाची भरपाई देखील होऊ शकली नाही. त्यामुळे यावर्षी करार शेतीचे १०० एकर क्षेत्र कमी केले आहे. राज्यात कोकण पासून ते पूर्व विदर्भापर्यंत असे अनेक शेतकरी भेटतील, ज्यांनी यावर्षी शेतीसाठी पैसा नाही म्हणून अजूनही पेरण्या केलेल्या नाहीत. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पावसाने वेळेवर हजेरीही लावली आहे. आठवडाभराच्या उघडिपीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. हे सर्व वातावरण खरीप पिकांच्या पेरणीसाठी अत्यंत पोषक आहे. परंतु गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनअखेर निम्म्याहून कमी क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे राज्याच्या कृषी विभागाला कमी क्षेत्रावरील पेरण्यांची भनक सुद्धा लागलेली नाही. कृषिमंत्री दादा भुसे यांना तर राज्यात पैशाअभावी शेती पडीक राहिली, हेच चुकीचे वाटते. दरवर्षी शेतकरी पीककर्ज घेऊन, उसनवारी करून पेरणी करतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शेतकरी पेरणी करतोच, हे सत्य आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये कोरोनाला घाबरून संपूर्ण देश (अपवाद काही अत्यावश्यक सेवा देणारे) घरात बसून असताना देशभरातील शेतकरी मात्र शेतात राबत होता. त्यामुळे गेल्यावर्षी खरीप हंगामात उच्चांकी क्षेत्रावर त्यांनी पेरणी सुद्धा करून दाखविली. यावर्षी मात्र सर्व बाजूंनी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्यामुळे पेरणीचा टक्का कमी दिसत आहे. ही बाब गंभीर म्हणावी लागेल.

मागील वर्षीच्या तिन्ही हंगामात नैसर्गिक आपत्तीने शेतीचे खूप नुकसान केले आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांना पीकविमा असो की शासकीय मदत मिळालेली नाही. जे काही अल्प उत्पादन हाती आले, त्याच्या वाहतूक, विक्रीसाठी लॉकडाउमुळे प्रचंड अडचणी आल्या. बाजार बंदमुळे शेतीमालास फारच कमी दर मिळाला. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च सुद्धा निघाला नाही. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला चांगलाच विळखा घातला. यांत अनेक शेतकरी कुटुंबाचा आरोग्यावर खूप पैसा खर्च झाला. आधीच कर्जबाजारी शेतकऱ्यांना आजारपणासाठी पदरमोड, उसनवारी करावी लागली. त्यामुळे खरीप पेरणीसाठी उसनवारीला पण मर्यादा आलेल्या आहेत. बहुतांश खासगी व्यापाऱ्यांनी कर्जासाठी हात आखडता घेतला आहे. उधारी बंद केली आहे. अशावेळी शेतकऱ्यांची पूर्ण भिस्त ही पीककर्जावर होती. परंतु यावर्षी बहुतांश बॅंका शेतकऱ्यांना कर्जच देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. खरे तर यावर्षीची शेतकऱ्यांची अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती पाहता खरीप पेरणीसाठी त्यांना शासनाकडून थेट आर्थिक मदत मिळायला हवी होती. शिवाय बॅंकांना सुद्धा अधिकाधिक शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करा, अशा स्पष्ट सूचना केंद्र-राज्य शासनाने देऊन याचा सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे होते. बॅंकांनी सुद्धा पीककर्ज पुरवठा प्राधान्याने करायला हवा होता. परंतु असे काहीही झाले नाही. आत्ताही वेळ गेलेली नाही, शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत, पीककर्ज उपलब्ध करून देऊन खरीप पिकांच्या पेरणीसाठी उभे करायला हवे.


इतर संपादकीय
इथेनॉलयुक्त भारतातूनच साधेल इंधन...भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस...
डीबीटी’ लाभदायकच!  कृषी विभागांतर्गतच्या विविध योजनांचा एक हजार...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
दिलासादायक दरवाढखरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपनशर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते...
बैलगाडा शर्यत ः ग्रामीण अर्थकारणाचे साधनबैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे....
‘सिट्रस इस्टेट’ला गतिमान करा विदर्भातील संत्रा या फळपिकाची उत्पादकता वाढवून...
जीवदान अन् दाणादाणहीयावर्षी जूनमध्ये ऐन पेरणीच्या हंगामातील पावसाचा...
स्वतंत्र सिंचन यंत्रणेची करा निर्मितीपंतप्रधान कृषी सिंचन योजना देशातील अनेक राज्यांत...
घटता सहभाग चिंता वाढविणारापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी...
अनुदानात अडकले सूक्ष्म सिंचनाचे थेंब ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापरून कमी पाण्यात...
हिरव्या ऋतूत पाण्याची वानवायावर्षी देशपातळीवर सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या...
तीन दशके आर्थिक उदारीकरणाची!वामनाने तीन पावलांत बळीराजाला पाताळात ...
शांतता, संसदेत गोंधळ सुरू आहे!अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्याने...
एफआरपी ः दूधदरावर कायमस्वरूपी तोडगाखरे तर मागील दशकभरापासून राज्यातील दुग्ध व्यवसाय...
अडचणीत वाढ अन् लुटीला प्रोत्साहनआधीच शेतकऱ्यांवर प्रचंड निर्बंध लादलेले असताना...
अवजारांची उपयुक्तता अन् दर्जा कसून...मागील दीड-दोन दशकांमध्ये देशात, राज्यात...
असा आदर्शवादी नेता पुन्हा होणे नाहीगणपतराव देशमुख ३० जुलै २०२१ ला आपल्यातून निघून...
आव्हान पाण्याच्या अन् चिखलाच्या पुराचेकोकणात २२ जुलै २०२१ या दिवशी ६३० मि.मी. एवढा...
जीवनमरणाचा प्रश्‍न निकाली काढामागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या चांगल्या...