agriculture news in marathi agrowon agralekh on lock down partially relief | Page 2 ||| Agrowon

अंशतः दिलासा

विजय सुकळकर
मंगळवार, 21 एप्रिल 2020

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग-व्यवसाय सुरु करताना कोरोना बाधितांची संख्या वाढणार नाही, ही काळजी उद्योजक आणि त्यातील कामकारांना देखील घ्यावी लागेल. तसे केले नाही तर बाधितांची संख्या वाढून संबंधित जिल्ह्यांत पुन्हा उद्योगाची सुरु झालेली चाके थांबू शकतात.
 

केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेतून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योग-व्यवहार सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुभा दिली आहे. देशभर लॉकडाउनचा निर्णय घेणे, त्याचा कालावधी वाढविणे हे दोन्ही निर्णय कठीण होते, परंतू कोरोनाला रोखण्यासाठी ते आवश्यक देखील होते. लॉकडाउनच्या निर्णयांचे काही अपवाद वगळता देशातील सर्व जनतेने काटेकोर पालन केले. त्यामुळे कोरोनाला आपण बऱ्यापैकी रोखू शकलो. महाराष्ट्रात कोरोनाची लागण आणि प्रसार झपाट्याने होतोय. राज्यात कोरोनाबाधिक रुग्णांची संख्या चार हजारांवर गेली असून ९१ टक्के रुग्ण हे मुंबई, पुणे, ठाणे, पालघर या चार जिल्ह्यांत आहेत. तर केवळ ९ टक्के रुग्ण उर्वरित भागांत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर हे जिल्हे रेड झोनमध्ये येतात. सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, औरंगाबादसह १८ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये येतात. तर ग्रीन झोनमध्ये ९ जिल्हे आहेत. रेड झोन म्हणजे कोरोनाचे १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेला जिल्हा, ऑरेंज झोन म्हणजे १५ पेक्षा कमी रुग्ण असलेला जिल्हा तर ग्रीन झोन म्हणजे एकही रुग्ण नसलेला जिल्हा. त्यामुळे या निर्णयाने रेड झोन वगळता उर्वरित राज्याला अंशतः दिलासा मिळू शकतो. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग-व्यवसाय सुरु करताना कोरोना बाधितांची संख्या वाढणार नाही, ही काळजी उद्योजक आणि त्यातील कामकारांना देखील घ्यावी लागेल. तसे केले नाही तर बाधितांची संख्या वाढून संबंधित जिल्ह्यांत पुन्हा उद्योगाची सुरु झालेली चाके थांबू शकतात.

कच्चा माल उत्पादन आणि पुरवठादार, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग-व्यवसाय आणि शेवटी प्रक्रियायुक्त उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचविणारे व्यावसायिक-विक्रेते अशा तीन टप्प्यांत उद्योग चालत असतो. यातील एक कडी तुटली तरी त्याचे परिणाम उर्वरित घटकांवर होतात. शेती आणि पूरक व्यवसाय उत्पादनांवर देशात, राज्यात अनेक उद्योग चालतात. मागील काही दिवसांपासून शेतीची कामे, शेतमाल विक्री वाहतूक अडथळ्यांच्या शर्यतीत चालूच आहे. परंतू त्यावरील प्रक्रिया उद्योग बंद असल्याने फळे-भाजीपाला, दूध, साखर अशा अनेक शेतमालाची मागणी घटून दर कमी झाले आहेत. त्यामुळे उद्योग-व्यवसाय सुरु झाल्याने शेतमालाचा उठाव होऊन दर वाढू लागतील. महत्वाचे म्हणजे लॉकडाउनमुळे शेती, उद्योग, व्यवसाय, सेवा या चारही क्षेत्रातील हातावर पोट असणाऱ्या गरीब- शेतमजूर, कंपनी कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. सरकार गरीबांना मोफत धान्य वाटत असले तरी केवळ पोट भरले म्हणजे झाले असे नसून कुटुंबाच्या दृष्टिने काही अत्यावश्यक गरजा असतात, त्याही पूर्ण झाल्या पाहिजेत. उद्योग-व्यवसाय सुरळीत सुरु झाल्यास शेतमजूर, कामगार यांना काम मिळून अशी असंख्ये कुटुंबेही आर्थिक स्थीर-स्थावर होतील. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या भागांत राज्यातील बहुतांश उद्योग एकवटलेले आहेत. यातील नाशिक जिल्हा वगळता तीन जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तेथील उद्योग पुढील काही काळ बंदच असतील. या दरम्यान या जिल्ह्यांनी लॉकडाउनचे काटेकोर पालन करायला हवे. स्वच्छता, आरोग्य, आहार याबाबत दक्ष राहून कोरोनाला दुर ठेवले पाहिजे. असे झाले तर तेथील उद्योग व्यवसायही लवकरच होतील.
..........................


इतर संपादकीय
धमक्या नको; हवा व्यवस्था बदलअनेक राष्ट्रीयीकृत बॅंका कर्ज देण्यासाठी टाळाटाळ...
बांधावरच्या तरुणाईला गरज स्व-संवादाची!अभिनेता सुशांतसिंह राजपूतने नुकताच टोकाचा निर्णय...
आरोग्य निर्भरतेसाठी पशुधन गाळतेय ‘लाळ’ राज्यात पशुरोग निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा...
राजर्षींचे आपत्ती व्यवस्थापन कौशल्य दोन एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर...
आपत्ती शिकविते नियोजनप्रभावी विस्तार शिक्षण यंत्रणा नसल्याने शाश्वत...
सडेवाडीचा आदर्शया वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने...
शेतकऱ्यांना हवी थेट आर्थिक मदतकोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेमधून...
दुबार पेरणीस शेतकऱ्यांना उभे करा राज्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक...
श्रमाचा बांध  ऐन पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्यानंतर...
पर्यटन पंढरीचा ‘निसर्ग’  निसर्ग आणि कोकण यांचे अतिशय जवळचे नाते आहे....
सुधारित तंत्रा’चा सरळ मार्ग  आपल्या देशात एचटीबीटी कापूस, बीटी वांगे, जीएम (...