agriculture news in marathi agrowon agralekh on Lonar to Landon inspiring journey of Raju kendre | Page 2 ||| Agrowon

लोणार ते लंडन प्रेरणादायी प्रवास

विजय सुकळकर
बुधवार, 7 जुलै 2021

सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगून प्रयत्न, कष्टात सातत्य असेल, तर कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा, समस्यांचा सामना करता येतो, ही शिकवण राजूच्या जीवन प्रवासातून मिळते. 
 

पूर्वी नोकरी करायची असेल तरच शिक्षण घेतले पाहिजे, व्यापार-व्यवसाय करायचा तर थोडीबहुत आकडेमोड आली पाहिजे आणि शेती करण्यासाठी तर शिक्षणाची गरजच नाही, असा सर्वसाधारण समज सर्वत्र होता. परंतु आता शेती असो की उद्योग-व्यवसाय शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्याचे कारण म्हणजे सर्वच क्षेत्रांत प्रचंड स्पर्धा वाढली आहे. शेती असो की छोटा-मोठा उद्योग-व्यवसाय यात नवनव्या संकल्पना, अद्ययावत तंत्रज्ञान वापरले तरच टिकाव लागू शकतो आणि हे शिक्षणाशिवाय शक्य नाही. त्यातच कोरोना संक्रमणाने ग्रामीण भागातील शिक्षण मागील दीड वर्षापासून जवळपास पूर्णपणे थांबलेले आहे. मोठ्या शहरांमध्ये ऑनलाइनच्या नावाखाली कसेबसे तरी शिक्षण सुरू आहे. ग्रामीण भागात मुळातच दहावी-बारावीनंतर गळतीचे प्रमाण जास्त होते. कोरोना काळातील शिक्षण बंदने हे प्रमाण अजून वाढले आहे. अशा परिस्थितीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे (ता. लोणार) या छोट्याशा गावातील राजू केंद्रे या तरुणास ब्रिटिश सरकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमातील सगळ्यात प्रतिष्ठित अशी चेवेनिंग शिष्यवृत्ती मिळाली आहे. जगभरातील १६० देश, ६३ हजारांवर अर्ज आणि त्यातून केवळ १४०० जणांत राजू यांनी या शिष्यवृत्तीसाठी आपले नाव निश्‍चित केले आहे. या शिष्यवृत्तीचा स्वीकृती दर (ॲक्सेप्टन्स रेट) हा केवळ दीड टक्का असताना त्यात स्थान मिळविणे किती अवघड असते, याचा अंदाज यायला हवा. इंग्लंडमधील विद्यापीठांत पदव्युत्तर शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

पैशाने पदव्या मिळविता येतात, पण ज्ञान नाही, असे म्हटले जाते. शिक्षणासाठी, ज्ञान मिळविण्यासाठी बुद्धिमत्ता आणि अपार कष्ट उपसण्यांची तयारी पाहिजेत, हेच राजू केंद्रे यांच्या निवडीतून सिद्ध होते. राजू यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी पाहिली तर इतर ग्रामीण विद्यार्थ्यांप्रमाणे जेमतेम दहावीपर्यंत त्यांनी मजल मारावी, अशीच आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढे पदवीपर्यंतचे शिक्षणही मराठी माध्यमातच झाले. उच्च शिक्षणातील त्यांच्या कुटुंबातील ही पहिलीच पिढी! शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजूचे आई-वडील १० एकर कोरडवाहू शेती कसतात. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. अशा परिस्थितीत राजू केंद्रे यांनी जगातील पहिल्या १८ विद्यापीठांच्या अभ्यासक्रमासाठी आपली निवड पक्की केली. परंतु लंडनला जाऊन हे शिक्षण घेण्यासाठी ४५ लाख रुपये खर्च येणार होता. त्यांनी संपूर्ण जमीन विकली तरी तेवढा पैसा मिळणार नव्हता. कोणतीही बॅंक तेवढे कर्ज देऊ शकत नव्हती. अशावेळी राजू यांनी हिंमत न हारता सातत्यपूर्ण प्रयत्नांतून तेवढ्या निधीची शिष्यवृत्ती मिळविली आहे. 

शेती आणि सामाजिक कार्याशी देखील त्यांची नाळ जुळलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास त्यांनी केला आहे. तसेच मेळघाट भागातील बालमृत्यू आणि कुपोषण कमी करण्याच्या मोहिमेमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाचा ‘रूरल डेव्हलपमेंट फेलो’ म्हणून पारधी समाजासाठी विकास कामे केली आहेत. सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगून प्रयत्न, कष्टात सातत्य असेल तर कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा, समस्यांचा सामना करता येतो, ही शिकवण राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना राजूच्या जीवन प्रवासातून मिळते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांचा उद्धार करायचा आहे.  शिवाय शेतकऱ्यांसाठीची धोरणे ही शेतकऱ्यांच्या मुलांनीच तयार केली पाहिजेत, यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत. विदेशातील उच्च शिक्षणाबरोबरच भविष्यातील त्यांच्या सर्वच उपक्रमांना शुभेच्छा!


इतर संपादकीय
इथेनॉलयुक्त भारतातूनच साधेल इंधन...भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस...
डीबीटी’ लाभदायकच!  कृषी विभागांतर्गतच्या विविध योजनांचा एक हजार...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
दिलासादायक दरवाढखरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपनशर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते...
बैलगाडा शर्यत ः ग्रामीण अर्थकारणाचे साधनबैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे....
‘सिट्रस इस्टेट’ला गतिमान करा विदर्भातील संत्रा या फळपिकाची उत्पादकता वाढवून...
जीवदान अन् दाणादाणहीयावर्षी जूनमध्ये ऐन पेरणीच्या हंगामातील पावसाचा...
स्वतंत्र सिंचन यंत्रणेची करा निर्मितीपंतप्रधान कृषी सिंचन योजना देशातील अनेक राज्यांत...
घटता सहभाग चिंता वाढविणारापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी...
अनुदानात अडकले सूक्ष्म सिंचनाचे थेंब ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापरून कमी पाण्यात...
हिरव्या ऋतूत पाण्याची वानवायावर्षी देशपातळीवर सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या...
तीन दशके आर्थिक उदारीकरणाची!वामनाने तीन पावलांत बळीराजाला पाताळात ...
शांतता, संसदेत गोंधळ सुरू आहे!अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्याने...
एफआरपी ः दूधदरावर कायमस्वरूपी तोडगाखरे तर मागील दशकभरापासून राज्यातील दुग्ध व्यवसाय...
अडचणीत वाढ अन् लुटीला प्रोत्साहनआधीच शेतकऱ्यांवर प्रचंड निर्बंध लादलेले असताना...
अवजारांची उपयुक्तता अन् दर्जा कसून...मागील दीड-दोन दशकांमध्ये देशात, राज्यात...
असा आदर्शवादी नेता पुन्हा होणे नाहीगणपतराव देशमुख ३० जुलै २०२१ ला आपल्यातून निघून...
आव्हान पाण्याच्या अन् चिखलाच्या पुराचेकोकणात २२ जुलै २०२१ या दिवशी ६३० मि.मी. एवढा...
जीवनमरणाचा प्रश्‍न निकाली काढामागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या चांगल्या...