agriculture news in marathi agrowon agralekh on loss of kharif crops due to mansoon | Agrowon

पावसाच्या बदलत्या पॅटर्नचा अभ्यास कधी?

विजय सुकळकर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

हवामानशास्त्र विभागाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातून पाय काढणाऱ्या परतीचा पावसाचा मुक्काम आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राहणार आहे.
 

‘‘दोन एकरातील सोयाबीन काढणीला आले असून पंधरा दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने मोठे नुकसान होत आहे.’’ ही प्रतिक्रिया आहे बीड जिल्ह्यातील ज्ञानोबा तिडके या शेतकऱ्याची! तर जोरदार सुरु असलेल्या पावसाने सोयाबीन व कापूस ही पिके घरात येतील की नाही, अशी चिंता जालना जिल्ह्यातील संदिप लोंढे पाटील या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. खरे तर मराठवाडा, विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांना अतिवृष्टिने मूग, उडीद हातचे गेल्यानंतर आता सोयाबीन, कापूस ही पिके हाती लागतील की नाही, याची चिंता सतावत आहे. जून महिन्यात सुरु झालेला पाऊस सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातही सुरुच आहे. सतत लागून असलेल्या पावसाने मराठवाड्यात सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटत आहेत. फुटलेला कापूस झाडावरच भिजून लोळत आहे. आत्तापर्यंतच्या पावसाने राज्यभरातील फळपिकांचे खूपच नुकसान केले. मूग, उडदाच्या शेंगा तर शेतकऱ्यांना तोडूही दिल्या नाहीत. आता खरीप हंगामातील महत्वाच्या अशा सोयाबीन आणि कापूस या पिकांचे नुकसान होत आहे. राज्यातील बहुतांश धरणे भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नद्यांना पूर येऊन परिसरातील पिके वाहून जात आहेत. त्यातच कोकणापासून ते विदर्भापर्यंत पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या नुकसानीत वाढच होईल.

राज्यात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाखाली खरीप हंगामात ८० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र असते. ही दोन्ही पिके राज्यातील जिरायती शेतीत बहुतांश अल्प-अत्यल्प भूधारक शेतकरी घेत असतात. कापूस, सोयाबीन जर शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही तर अख्खा खरीप वाया गेला, असे म्हणावे लागेल. खरीप हंगामासाठी यावर्षी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी उभा राहिलेला आहे. लॉकडाउनमुळे त्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही की वेळेवर चांगले बी-बियाणे मिळाले नाही. त्यातच सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणाने सर्वच पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढून त्यांच्या नियंत्रणासाठी खर्च देखील वाढला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची तत्काळ पहाणी, पंचनामे करायला हवेत. एवढेच नव्हे तर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वेळेत मिळेल, याची काळजी शासन-प्रशासनाने घ्यायला हवी. विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांना पीकविम्याचा आधार दिला आहे. आता पिकांचे नुकसान होताना जिल्हा प्रशासन नुकसानीची माहिती तीन दिवसांत विमा कंपन्यांना द्या, तर विमा कंपन्या आपल्या नुकसानीचे फोटो, माहिती अॅप अपलोड करा, म्हणून शेतकऱ्यांना सांगत आहे. अनेक शेतकरी असे न करु शकल्याने ते विम्याच्या मदतीपासून वंचित राहू शकतात. तसे होणार नाही ही काळजी शासन-प्रशासन तसेच विमा कंपन्यांनी घ्यायला हवी.

मागील चार-पाच वर्षांपासून लांबलेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान वाढत आहे. अशावेळी हवामानशास्त्र विभागाने परतीच्या पावसाचा पॅटर्न बदलत असल्याचे मागच्या मे मध्ये म्हणजे उशिरानेच जाहीर केले आहे. हवामानशास्त्र विभागाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातून पाय काढणाऱ्या परतीचा पावसाचा मुक्काम आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राहणार आहे. या सुधारीत वेळापत्रकाचा अभ्यास करून त्यानुसार खरीप पीक लागवडीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हायला हवे. सोयाबीनसारख्या पिकात थोड्या अधिक कालावधीची वाणे शेतकऱ्यांना आता उपलब्ध व्हायला हवीत.


इतर संपादकीय
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
दारिद्र्य निर्मुलनाची बिकट वाट आजही जगातील ८ ते १० टक्के लोक प्रतिदिवस १.९०...
डोळ्यातल्या पाण्याचे मोलऑ क्टोबरचा दुसरा पंधरवाडा चालू आहे. मूग, उडीद,...
किंमत कण कण अन्नाची!गोंदिया जिल्ह्यातील खाडिपार येथील एक संत महात्मा...
‘सोपा’ची पोटदुखी‘सो पा’ने (सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया...
शेतकऱ्यांना हवे ‘अर्थ’पूर्ण संरक्षण!पीकविम्याचा लाभ कोणाला? नैसर्गिक आपत्ती, कीड आणि...
कोमेजलेली फुलेकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउनच्या...
सुधारणांतील बिघाड! कृषी-पणन सुधारणा शेतकऱ्यांना कितपत फायदेशीर...
संत्र्याची रेल्वेवारी, फलदायी ठरावीनाशवंत शेतमालाची देशांतर्गत जलद आणि कमी खर्चात...