agriculture news in marathi agrowon agralekh on mahareshim abhiyan | Agrowon

रेशीम संजीवनी

विजय सुकळकर
शनिवार, 25 जानेवारी 2020

मराठवाडा आणि विदर्भात मुळातच फारसे शेतीपूरक व्यवसाय नाहीत. अशावेळी रेशीम शेती या भागांतील शेतकऱ्यांना संजीवनी ठरू शकते.
 

रेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या उद्देशाने राज्यभर महारेशीम अभियान राबविले जात आहे. अगोदर ७ ते २१ जानेवारीपर्यंतच हे अभियान राबविले जाणार होते. परंतु, यांस मिळणारा उत्तम प्रतिसाद अन् त्याचवेळी नोंदणी व्यवस्थेतील काही ठिकाणच्या तांत्रिक अडचणीमुळे महारेशीम अभियानाला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या तुलनेत मराठवाडा विभागात या अभियानाला मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय म्हणावा लागेल. या अभियानांतर्गत आत्तापर्यंत राज्यभर आठ हजारांवर शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी नाव नोंदणी केली आहे. त्यात पाच हजारवर शेतकरी मराठवाड्यातील आहेत. हवामान बदलाच्या काळात राज्यातील ८२ टक्के जिरायती शेती धोक्यात आली आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्तींनी खरीप, रब्बी हंगामातील कोणत्याही पिकापासून उत्पादनाची शाश्वती राहिलेली नाही. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसत आहे. अशा परिस्थितीत रेशीम शेती ही या भागातील शेतकऱ्यांना अधिक आश्वासक वाटते आहे. त्याचे कारण म्हणजे दुष्काळातही या भागातील अनेक शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाने चांगला आधार दिला आहे. इतर नैसर्गिक आपत्तीतही रेशीम शेती चांगली तग धरून राहते. अशावेळी महारेशीम अभियानांतर्गत तुती लागवडीच्या नोंदणीपासून ते रेशीम कोशांचे यशस्वी उत्पादन घेण्यापर्यंतचे मार्गदर्शन, त्या आनुषंगिक बाबींच्या पुरवठ्याने यांस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. 
खरे तर मोहीम, अभियान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. मात्र, महारेशीम अभियानाबाबत मागील जवळपास पाच वर्षांपासून शेतकरी दाखवीत असलेली उत्सुकता पाहता रेशीम विभागालाच हे अभियान गतीने पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. या अभियानाची १० दिवस वाढविलेली मुदत हे त्याचेच द्योतक आहे.

मराठवाड्यासह राज्यभरातील शेतकरी वाढीव मुदतीचा फायदा घेऊन अधिकाधिक नोंदणी करतील, अशी आशा करूया. योग्य नियोजन, त्यात शेतकऱ्यांचे होत असलेले प्रबोधन, कृषी-रेशीम विभागातील समन्वय, रेशीम शेतीस दिलेली मनरोगाची जोड त्यामुळे अगोदरच्या महारेशीम अभियानांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. त्याला या वेळी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्रा) प्रकल्पाची साथ मिळाली आहे. पोक्रा प्रकल्प राज्यभरात १५ जिल्ह्यांमधील (मराठवाडा ८, विदर्भ ६ आणि जळगाव जिल्हा) हवामानास अतिसंवेदनशील अशा ५१४२ गावांमध्ये राबविला जातोय. या प्रकल्पास जागतिक बॅंकेचे अर्थसाह्य आहे. पोक्रा प्रकल्पांतर्गत महारेशीम अभियानाद्वारे रोपवाटिका (१.५ लाख), कीटक संगोपनगृह (१.६८ लाख) तुती लागवड (५० हजार) आणि साहित्य (७५ हजार) या निर्धारित रकमेवर सर्वसामान्य शेतकऱ्यांना ७५ टक्के तर मागासवर्गीयांना ९० टक्के अनुदान मिळते. महत्त्वाचे म्हणजे अनुदान मिळण्याबाबतची प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस (ऑनलाइन), पारदर्शी आणि गतिमान आहे. याचा लाभ रेशीम शेतीत उतरणाऱ्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. गट-समूहांना महारेशीम अभियानांतर्गत प्राधान्य दिले जाते. राज्यात रेशीम शेती वाढविण्यासाठी हे अभियान म्हणजे सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. मराठवाडा आणि विदर्भात मुळातच फारसे शेतीपूरक व्यवसाय नाहीत. अशावेळी रेशीम शेती या भागांतील शेतकऱ्यांना संजीवनी ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र यावे, महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी करावी. अभ्यास आणि प्रशिक्षणातून ज्ञान-कौशल्य मिळवावे, यातील सर्व योजनांचा योग्य लाभ घ्यावा आणि शेतीबाबतच्या अनिश्चित अशा एकंदरीतच वातावरणात शाश्वत मिळकतीची रेशीम शेती करावी. 


इतर संपादकीय
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
आता तरी सोडा धरसोडीचे धोरणसध्या बाजारात तुरीची आवक सुरू झाली असून अपेक्षित...
ग्रामीण विकासाचा ‘पर्यटन’ मार्गगेल्या आठवड्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात...
संशोधनासाठीसुद्धा आता हवा जनरेटामागील वर्षी स्पेनमधील माद्रिद येथे संयुक्त...
आता वाढवा कामाचा वेगमहाविकास आघाडी सरकारने राज्यातील सरकारी अधिकारी-...
वृक्षसंवर्धनासाठी अनोखे संमेलनअमेरिकेमधील टेक्सास प्रांतात मी एक उद्यान पहावयास...
क्रियेवीण वाचाळता व्यर्थचभारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेच्या माध्यमातून...
शिवार जलयुक्त झाले, तर वॉटर ग्रीड...जलयुक्त शिवार, झाडे लावा या दोन्ही योजना पूर्वी...
‘एनएचबी’तील गोंधळम हाराष्ट्र राज्य फळे-फुले-भाजीपाला लागवड आणि...
तंत्रज्ञान स्वातंत्र्यास आग्रही...शरद जोशी यांना ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात जे...