agriculture news in marathi agrowon agralekh on Mosambi (sweet orange) area increases in Maharashtra | Page 2 ||| Agrowon

क्लस्टरद्वारेच वाढेल मोसंबीचा गोडवा

विजय सुकळकर
मंगळवार, 6 जुलै 2021

मोसंबी क्लस्टरचे काम लवकर मार्गी लावून या फळपिकाचे शाश्‍वत उत्पादन, प्रक्रिया ते निर्यातीपर्यंतचा मार्ग सुकर करायला हवा.
 

गेल्याकाही वर्षांपासून राज्यात मोसंबीची लागवड वाढत असल्याचे दिसून येत आहे. मोसंबी रोपांची वाढती मागणी पाहता कृषी विद्यापीठांतील रोपवाटिकेत रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. असाच काहीसा अनुभव खासगी रोपवाटिकांवाल्यांचा पण आहे. संत्रा या फळपिकामधील नवीन वाणांची वानवा, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, बदलत्या हवामानामुळे बहर नियोजनात येत असलेल्या अडचणी, फळगळतीची मोठी समस्या, कमी उत्पादकता, वाहतूक-विक्री-निर्यात-प्रक्रिया अशा सर्वच पातळ्यांवर समस्यांचा डोंगर उभा असल्यामुळे राज्यातील खासकरून विदर्भातील शेतकऱ्यांचा कल मोसंबीकडे असल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात व्हिटॅमीन ‘सी’ करिता मोसंबीला मागणी वाढलेली आहे. काही मोसंबी उत्पादकांना दरही चांगला मिळतोय. शिवाय निश्चित फळधारणा आणि फळगळ कमी, संत्र्याप्रमाणे आधाराची गरज नाही, कीड-रोगही तुलनात्मक कमी, अशी कारणे देखील मोसंबी लागवड वाढण्यामागे आहेत. 

खरे तर मराठवाड्यातील नांदेड, जालना, औरंगाबाद हा मोसंबीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. राज्यात उत्पादनक्षम मोसंबी बागांचे क्षेत्र जवळपास ३३ हजार हेक्टर आहे. त्यापैकी २५ ते २७ हजार हेक्टर क्षेत्र मराठवाड्यात आहे. २०१९ पूर्वीच्या सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्यासह, तेलंगणा राज्यातही मोसंबीचे क्षेत्र थोडेफार कमी झाले. त्यामुळे या भागांतून बाजारात मोसंबी फळांची आवक कमी झाली. ही उणीव भरून काढण्यासाठी विदर्भातील संत्रा पट्ट्यातील शेतकरी मोसंबीची लागवड करीत आहेत. त्यातच २०१९ पासूनच्या चांगल्या पाऊसमानामुळे बागायती फळपिक मोसंबीची लागवड वाढत आहे. असे असले तरी संत्र्याप्रमाणेच मोसंबी देखील राज्यात वाणं संसोधन ते मूल्यवर्धन अशा सर्वच पातळ्यांवर दुर्लक्षित राहिलेले आहे.

मोसंबी लागवडीसाठी न्युसेलर, सातगुडी याबरोबर काही स्थानिक वाणांची लागवड होते. या वाणांचा रस काढल्याबरोबर लगेच प्यावा लागतो. नाही तर कडवट होऊन खराब होतो. त्यामुळे मोसंबीचे फळ ताजे खाण्यापासून ते गाड्यावर काढून मिळणाऱ्या रसापलीकडे प्रक्रियेच्या बाबतीत कधी गेले नाही. ब्राझील, इस्राईलसारखे देश प्रक्रियेसाठी मोसंबीची वाण विकसित करून शेतकऱ्यांना देत असताना आपल्याकडे मात्र अशी वाणं मिळत नाहीत. दक्षिण आफ्रिका, इस्राईल या देशांनी घन-सघन पद्धतीने (हेक्टरी १००० झाडे) मोसंबीची लागवड करून उत्पादकता वाढ साधली आहे. आपल्याकडे मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीनेच (हेक्टरी २७७ झाडे) मोसंबीची लागवड केली जाते. घन पद्धतीने यापेक्षा दुप्पट झाडे आपल्याकडे बसवून मोसंबीची उत्पादकता वाढविता येऊ शकते. बदलत्या हवामान काळात मोसंबीचे बहर व्यवस्थापनही जिकिरीचे ठरत आहे. शास्त्रशुद्ध बहर व्यवस्थापनाची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी पोहोचविली जात नाही. मोसंबी फळांची काढणी केल्यावर साठवणूक, विक्री, प्रक्रियेबाबत काही सोयीसुविधा नसल्याने काढलेल्या मोसंब्या ट्रकमध्ये भरून शेतकऱ्यांना विक्रीस पाठवाव्या लागतात. त्यामुळे त्या जास्त वेळ टिकत नाहीत, शिवाय दरही कमी मिळतो.

राज्यात फळपिकांचा क्लस्टरनिहाय विकास केला जात आहे. मराठवाड्यासह आता विदर्भातही मोसंबीची लागवड वाढत असताना क्लस्टर करून या फळपिकाचा विकास करायला हवा. तशी मागणीही राज्यातील मोसंबी उत्पादकांकडून होतेय. राज्याचे फळबाग व रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी असे क्लस्टर औरंगाबाद जिल्ह्यात उभारले जाईल, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी केली आहे. या क्लस्टरचे काम लवकर मार्गी लावून मोसंबीचे शाश्‍वत उत्पादन, प्रक्रिया ते निर्यातीपर्यंतचा मार्ग सुकर करायला हवा.


इतर संपादकीय
इथेनॉलयुक्त भारतातूनच साधेल इंधन...भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस...
डीबीटी’ लाभदायकच!  कृषी विभागांतर्गतच्या विविध योजनांचा एक हजार...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
दिलासादायक दरवाढखरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपनशर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते...
बैलगाडा शर्यत ः ग्रामीण अर्थकारणाचे साधनबैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे....
‘सिट्रस इस्टेट’ला गतिमान करा विदर्भातील संत्रा या फळपिकाची उत्पादकता वाढवून...
जीवदान अन् दाणादाणहीयावर्षी जूनमध्ये ऐन पेरणीच्या हंगामातील पावसाचा...
स्वतंत्र सिंचन यंत्रणेची करा निर्मितीपंतप्रधान कृषी सिंचन योजना देशातील अनेक राज्यांत...
घटता सहभाग चिंता वाढविणारापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी...
अनुदानात अडकले सूक्ष्म सिंचनाचे थेंब ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापरून कमी पाण्यात...
हिरव्या ऋतूत पाण्याची वानवायावर्षी देशपातळीवर सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या...
तीन दशके आर्थिक उदारीकरणाची!वामनाने तीन पावलांत बळीराजाला पाताळात ...
शांतता, संसदेत गोंधळ सुरू आहे!अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्याने...
एफआरपी ः दूधदरावर कायमस्वरूपी तोडगाखरे तर मागील दशकभरापासून राज्यातील दुग्ध व्यवसाय...
अडचणीत वाढ अन् लुटीला प्रोत्साहनआधीच शेतकऱ्यांवर प्रचंड निर्बंध लादलेले असताना...
अवजारांची उपयुक्तता अन् दर्जा कसून...मागील दीड-दोन दशकांमध्ये देशात, राज्यात...
असा आदर्शवादी नेता पुन्हा होणे नाहीगणपतराव देशमुख ३० जुलै २०२१ ला आपल्यातून निघून...
आव्हान पाण्याच्या अन् चिखलाच्या पुराचेकोकणात २२ जुलै २०२१ या दिवशी ६३० मि.मी. एवढा...
जीवनमरणाचा प्रश्‍न निकाली काढामागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या चांगल्या...