agriculture news in marathi agrowon agralekh on purchasing power of rural people | Agrowon

शेतीतूनच जाते आर्थिक विकासवाट

विजय सुकळकर
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

वस्तुमाल व सेवांचा खप होण्यासाठी देशातील कोट्यवधी ग्राहकांकडे (फक्त काही लाख उच्च-मध्यमवर्गीयांकडे नव्हे) क्रयशक्ती पाहिजे, आणि क्रयशक्ती ही रोजगारातून निर्माण होत असते.

भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. त्यातच आता देशातील ग्रामीण क्रयशक्तीने मागील चार दशकांतील नीचांकी पातळी गाठल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या अप्रकाशित अहवालावरून स्पष्ट होते. देशातील सर्वसामान्य जनतेची क्रयशक्ती आणि अर्थव्यवस्थेतील मंदी याचा फारच जवळचा संबंध आहे. लोकसंख्येने मोठ्या वर्गाची क्रयशक्ती सातत्याने घसरत असेल, तर मंदीच्या दृष्टचक्रातून देशाची लवकर सुटका नाही, हेही खरे आहे. देशाची अर्थव्यवस्था आशिया खंडात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपण जागतिक अर्थव्यवस्थेत दबदबा निर्माण करण्याचे स्वप्न पाहत आहोत; परंतु मागील सलग पाच तिमाहीमध्ये भारताच्या विकासदरात घसरण होत आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था; तसेच अर्थतज्ज्ञ भारताच्या रसातळाला जात असलेल्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करीत आहेत. केंद्र सरकारला मात्र अर्थव्यवस्थेच्या भीषण परिस्थितीबाबत गांभीर्य दिसत नाही. 

अनेक राष्ट्रीयीकृत, तसेच खासगी बॅंकांचा वार्षिक तोटा वाढत आहे. ऑटोमोबाईल, मोबाईल, विमान, बांधकाम, संगणक कंपन्याही तोट्यात जात आहेत. सेवा आणि कंपन्यांच्या उत्पादनांना ग्राहकच मिळत नसल्याने त्यांनी सेवा; तसेच वस्तू-उत्पादने निर्मिती थांबविली आहे. तोट्यातील कंपन्या उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार कमी करीत आहेत; तर नवीन रोजगाराच्या संधी उपलब्धतच होत नाहीत. मागील ४५ वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण सध्या देशात आहे. वस्तुमाल व सेवांचा खप होण्यासाठी देशातील कोट्यवधी ग्राहकांकडे (फक्त काही लाख उच्च-मध्यमवर्गीयांकडे नव्हे) क्रयशक्ती पाहिजे. आणि क्रयशक्ती ही रोजगार, स्वयंरोजगारातून निर्माण होत असते. देशातील राज्यकर्ते ही बाब दुर्लक्षित करून केवळ उद्योग-व्यवसायांना आर्थिक मदतीचे पॅकेजेस, करसवलत दिली म्हणजे अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येण्याची स्वप्ने पाहत आहेत, जे कदापि पूर्ण होणार नाही. 

देशातील ५५ ते ६० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराच्या अनेक संधी दडलेल्या आहेत; परंतु शेती क्षेत्राचा विकासदर उणे चालू आहे. अशा परिस्थितीत बहुसंख्य लोकांची म्हणण्यापेक्षा कोट्यवधी ग्राहकांची क्रयशक्ती कशी वाढणार, हा खरा प्रश्न आहे. आज वाढत्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे उत्पादन घटत आहे. उत्पादित शेतमालास रास्त दर मिळत नाही. शेतीपूरक व्यवसायही वाढता उत्पादन खर्च आणि कमी मिळकतीने तोट्यात आहेत. केंद्र-राज्य शासनांच्या शेती-शेतकरीविरोधी धोरणांमुळेसुद्धा शेती; तसेच पूरक व्यवसाय आतबट्ट्यांचे ठरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये गरीब-बिचारा शेतकरी म्हणून त्यावर दया करू नका, तर शेती विकासातून देशातील बहुतांश लोकांची क्रयशक्ती वाढणार, त्यातून भांडवली अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. म्हणून या क्षेत्रावर सरकारने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

शेतीसाठीच्या पायाभूत ते अत्याधुनिक सुविधा ग्रामीण भागात विकसित करण्यावर शासनाने भर द्यायला हवा. जगभरातील शेतीचे प्रगत तंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला हवे. देशातील शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरण्याबाबतचे थेट निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करायला पाहिजे.  शेतकऱ्यांची मुलं, ग्रामीण भागातील युवकांनी बदलती शेतीपद्धती; तसेच जागतिकीकरणाच्या रेट्यात उपलब्ध नवनव्या संधी शोधायला हव्यात. आपापल्या भागातील प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसित केली तरी अनेकांना रोजगार मिळू शकतो. याशिवाय शहरी-निमशहरी भागातील पारंपरिक लघू-कुटीर उद्योगालाही बळ देण्याचे शासनाचे धोरण पाहिजेत. असे झाले तरच देशातील मोठ्या लोखसंख्येची क्रयशक्ती वाढेल आणि रसातळाला जात असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल. 


इतर संपादकीय
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
वणवा पेटतोयअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे...
कार्यक्षम खत व्यवस्थापनेतून साधूया...हरितक्रांतीच्या यशात अधिक उत्पादनक्षम गहू बियाणे...
घरात असावे एकमत‘शेतात खत, गावात पत अन् घरात एकमत असावे’ अशी एक...
काटेरी राजमुकुटमहाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या...
गोसमृद्धीची अग्निपरीक्षा तीन दिवस पुणे ‘गो'' रंगात सजणार आहे. गाय आणि...
योजना माझ्या हातीकृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत...
दारिद्र्यनिर्मूलनासाठी हवा ठोस कार्यक्रमआज रोजी देशातील कोट्यधीशांची संख्या वाढत असताना...
आमदार बंधूभगिनींनो पत्रास कारण की...आमदार बंधूभगिनींनो नमस्कार,  आजघडीला...
अखेर फासे उलटलेच!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी...
गोवंशहत्याबंदी अव्यवहार्यच!महाराष्ट्र या (तथाकथित) पुरोगामी राज्यात...
फसवणूक थांबणार कधी?नाशिक जिल्ह्यात दोन व्यापाऱ्यांनी ४० टोमॅटो...
पाहणी-पंचनाम्यांचा फार्सराज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी...
दुतोंडीपणाचा कळस?राज्यसभेच्या २५०व्या सत्र किंवा अधिवेशनानिमित्त...
‘कोरडवाहू’चे वैचारिक सिंचनकोरडवाहू (जिरायती) शेती समस्यांबाबत दोन दिवसांचे...