agriculture news in marathi agrowon agralekh on Shetkari mitra - farmer produer compony from Nanded which helping in different way to farmers | Page 2 ||| Agrowon

अडचणीतील शेतकऱ्यांचा ‘मित्र’

विजय सुकळकर
सोमवार, 28 जून 2021

एकत्रित येऊन एकमेकांना सहकार्याच्या भावनेतून शेतीत मदत करण्याची भावना लुप्त होत असताना शेतकरी मित्र - शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने ‘मित्र’ म्हणून काम करीत आहे.

या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसावर राज्यात पेरण्यांना वेग आला. 
परंतु त्यानंतरच्या १०-१२ दिवसांपासूनच्या उघडिपीने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सोयाबीनसह इतरही खरीप पिकांची पहिली पेरणीच कशीबशी आर्थिक जुगाड करून केली, त्यात बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे दुबार पेरणी आता करायची तरी कशी, अशी चिंता अनेक शेतकऱ्यांसमोर आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर - मालेगाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी तर आता दुबार पेरणी आम्हाला शक्यच नाही, अशी खंत व्यक्त केली होती. शेतकऱ्यांची ही चिंता ‘शेतकरी मित्र - शेतकरी उत्पादक कंपनी’च्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘ट्रॅक्टर आमचे - डिझेल तुमचे’ या तत्त्वावर शेतकऱ्यांना शेतकरी मित्र - उत्पादक कंपनी दुबार पेरणी करून देत आहे. शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सवलतीच्या दरात शेतीतील कामेदेखील या कंपनीद्वारे करून दिली जातात. एकत्रित येऊन एकमेकांना सहकार्याच्या भावनेतून शेतीत मदत करण्याची भावना लुप्त होत असताना शेतकरी मित्र - शेतकरी उत्पादक कंपनी ही नावाप्रमाणे अडचणीतील शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने ‘मित्र’ म्हणून काम करीत आहे. या कंपनीचा हा उपक्रम पाहून राज्यातील इतर काही शेतकरी उत्पादक कंपन्याही शेतकऱ्यांना अशा प्रकारची मदत करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत, ही बाबही चांगलीच म्हणावी लागेल.

सध्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत, पेरणी ते शेतीमाल वाहतूक असा खर्च वाढला आहे. एक एकर पेरणीसाठी सहा ते सात लिटर डिझेल लागते. डिझेलचे दर ९६ ते ९८ रुपये प्रतिलिटरवर गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एक एकर पेरणीसाठी ७०० रुपये डिझेलसाठी खर्च येतोत. भाडेतत्त्वावर ट्रॅक्टरद्वारे एक एकराची पेरणी करण्यासाठी १४०० ते १५०० रुपये घेतात. अर्थात, ट्रॅक्टर आमचे - डिझेल तुमचे या तत्त्वाद्वारे दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा निम्मा खर्च (एकरी ७०० ते ८०० रुपये) वाचत आहे. त्याही पुढील बाब म्हणजे दुबार पेरणी शक्य नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर पेरणी होत आहे. शेतकरी मित्र - उत्पादक कंपनीचा पायाच मुळी आध्यात्मिक आहे.

या उत्पादक कंपनीशी ३८ ते ४० शेतकरी जुडलेले आहेत. व्यसनाने शेतकऱ्यांबरोबर एकंदरीत समाजाचेच खूप वाटोळे केले. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यसनापासून सुटका करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात. आध्यात्मिक विचारसरणीतूनच गट-कंपनीतील शेतकऱ्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, संघटन, सहकार्य, मदत या भावना वाढीस लागल्या आहेत. शेतीमध्ये एकमेकांचा आधार आता तुटत चाललेला असताना सहकार्याची भावना वृद्धिंगत होणे फार गरजेचे आहे. असे एकमेकांच्या सहकार्यातूनच शेतीत भविष्यात येणारी मोठमोठी आव्हाने पेलली जाणार आहेत. शिवाय यौगिक शेती, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम ही उत्पादक कंपनी करते. 
सेंद्रिय-जैविक शेतीबरोबर अशा शेतीला लागणाऱ्या निविष्ठा बनविण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना या कंपनीद्वारे दिले जाते. दर्जेदार शेतीमालाची विक्री, निर्यात (प्रामुख्याने हळद) यातही शेतकरी मित्र - उत्पादक कंपनीचे योगदान राहिले आहे. शेतीमाल विक्री-निर्यातीत काही तरुणांना रोजगारही मिळाला आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातूनच आता शेतीचा विकास शक्य आहे. अशावेळी काही शेतकरी उत्पादक कंपन्या आपापल्या परिसरात नवनवीन संकल्पना राबवीत असताना राज्यातील शेतीचे भवितव्य उज्ज्वल दिसते.


इतर संपादकीय
इथेनॉलयुक्त भारतातूनच साधेल इंधन...भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस...
डीबीटी’ लाभदायकच!  कृषी विभागांतर्गतच्या विविध योजनांचा एक हजार...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
दिलासादायक दरवाढखरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपनशर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते...
बैलगाडा शर्यत ः ग्रामीण अर्थकारणाचे साधनबैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे....
‘सिट्रस इस्टेट’ला गतिमान करा विदर्भातील संत्रा या फळपिकाची उत्पादकता वाढवून...
जीवदान अन् दाणादाणहीयावर्षी जूनमध्ये ऐन पेरणीच्या हंगामातील पावसाचा...
स्वतंत्र सिंचन यंत्रणेची करा निर्मितीपंतप्रधान कृषी सिंचन योजना देशातील अनेक राज्यांत...
घटता सहभाग चिंता वाढविणारापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी...
अनुदानात अडकले सूक्ष्म सिंचनाचे थेंब ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापरून कमी पाण्यात...
हिरव्या ऋतूत पाण्याची वानवायावर्षी देशपातळीवर सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या...
तीन दशके आर्थिक उदारीकरणाची!वामनाने तीन पावलांत बळीराजाला पाताळात ...
शांतता, संसदेत गोंधळ सुरू आहे!अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्याने...
एफआरपी ः दूधदरावर कायमस्वरूपी तोडगाखरे तर मागील दशकभरापासून राज्यातील दुग्ध व्यवसाय...
अडचणीत वाढ अन् लुटीला प्रोत्साहनआधीच शेतकऱ्यांवर प्रचंड निर्बंध लादलेले असताना...
अवजारांची उपयुक्तता अन् दर्जा कसून...मागील दीड-दोन दशकांमध्ये देशात, राज्यात...
असा आदर्शवादी नेता पुन्हा होणे नाहीगणपतराव देशमुख ३० जुलै २०२१ ला आपल्यातून निघून...
आव्हान पाण्याच्या अन् चिखलाच्या पुराचेकोकणात २२ जुलै २०२१ या दिवशी ६३० मि.मी. एवढा...
जीवनमरणाचा प्रश्‍न निकाली काढामागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या चांगल्या...