agriculture news in marathi agrowon agralekh on unauthorized HTBT and dangerous seed import | Agrowon

बियाणे दहशतवाद गंभीरच!

विजय सुकळकर
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

अनधिकृत एचटीबीटी असो अथवा आता संशयास्पद बियाण्याचा देशातील शिरकाव होण्याची शक्यता असो शेतकऱ्यांनीच अशा प्रकाराला आळा घातला पाहिजे, असे केंद्र-राज्य शासनाला वाटत असून ही बाब गंभीर म्हणावी लागेल.
 

तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या देशातील फैलावामुळे बियाणे उद्योगाला ३०० कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचे ‘नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया’ने नुकतेच स्पष्ट केले आहे. यावर्षी काळ्या बाजारात अनधिकृत एचटीबीटीची ५० लाख पाकिटे विकली गेली असल्यामुळे अधिकृत बियाणे उद्योगाचा मोठा हिस्सा एचटीबीटीने पळविला आहे. त्यामुळे बियाणे उद्योग क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे. खरे तर एचटीबीटीचा चोरट्या मार्गे देशात प्रवेश पाच वर्षांपूर्वी झालेला आहे. या पाच वर्षांत हा काळा बाजार महराष्ट्रासह चार-पाच राज्यांत पसरला आहे. या सर्व बाबी उघड असताना याबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला बियाणे उद्योगाला थोडा उशीरच झाला म्हणावे लागेल. आत्ताही बियाणे उद्योगाची भूमिका स्पष्ट नसून एक तर हे तंत्र खुले करा किंवा त्यावर बंदी आणा, अशी आहे. अर्थात काहीही निर्णय घेऊन एकदाचे मोकळे व्हा, असा संदेश यातून मिळतो. देशातील बियाणे उद्योगाने  याबाबत स्पष्ट भुमिकेद्वारे शासनाला मार्गदर्शनाचे काम करणे गरजेचे होते. परंतू तसे मात्र झाले नाही. 

देशात अनधिकृत एचटीबीटी बियाण्याचा शिरकाव, त्याची व्याप्ती हे कार्य शासनासह संस्थात्मक पाठबळाशिवाय शक्य नाही. हे बियाणे कोणत्या कंपनीचे आहे, ते देशात कसे आले, त्याचे बीजोत्पादन, पॅकींग, वाहतूक, विक्री कोण आणि कशी करते ह्या सर्व बाबी शासकीय यंत्रणेला माहित आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकार थांबवायचे म्हटले तर यंत्रणेला ते अवघडही नाही. परंतू शासन, प्रशासनाची तशी इच्छाशक्तीच दिसत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे शासनाला खरोखरच हे बियाणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, त्याचे कोणावर काहीही दुष्परिणाम होत नाहीत, असे वाटत असेल तर मग हे बियाणे शेतकऱ्यांसाठी खुले करावे. परंतू त्यासाठी एचटीबीटीच्या व्यापक चाचण्या घेऊन त्यातून हा विषय मार्गी लावायला हवा. तेही शासन करीत नाही, हे सर्व अनाकलनिय आहे.   

याला जोडूनच अजून एक मुद्दा बियाणे उद्योगाने पुढे आणला आहे. बियाणे दहशतवादाचा हा गंभीर विषय आहे. ऑनलाइन व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून चीनकडून अमेरिकेमध्ये अनोळखी अन् संशयास्पद बियाणे पाकिटे पाठविण्यात आली आहेत. जागतिक बियाणे परिक्षण संघटना याबाबत सर्व देशांना जागरुक करीत असून या संकटापासून भारताने सावध राहावे, असा इशारा दिला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून अशा बियाण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. आता राज्य शासन एक पत्रक काढून शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा देऊन यातून सुटकेचा सुस्कारा सोडेल. 

अनधिकृत एचटीबीटी असो अथवा आता संशयास्पद बियाण्याचा देशातील शिरकावाची शक्यता असो शेतकऱ्यांनीच अशा प्रकाराला आळा घातला पाहिजे, असे केंद्र-राज्य शासनाला वाटत असून ही बाब गंभीर म्हणावी लागेल. वास्तविक पाहता बाहेर देशातून बियाणे असो की इतर कोणतीही वस्तू याची देशात आयात होताना त्यातून काही घातक बियाणे अथवा जीवाणू-विषाणूचा देशात प्रवेश तर होत नाही ना, हे तपासण्याची केंद्र -राज्य शासन पातळीवर यंत्रणा आहे. या यंत्रणेने ठरविले, प्रत्येक टप्प्यावर सावधानता बाळगळी तर संशयास्पद बियाणे असो की घातक जंतू याचा देशात प्रवेश आणि प्रसार थांबविता येते. त्यामुळे शासकीय यंत्रणेने वरून खालपर्यंत नुसत्या सूचना देऊन चालणार नाही तर अधिक सतर्क राहावे लागेल. कोरोनापासून आपण काही धडा घेणार आहोत की नाही?  


इतर संपादकीय
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
कुलगुरु निवडीत नको तडजोडमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे (जि.अहमदनगर...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
पावसाच्या बदलत्या पॅटर्नचा अभ्यास कधी?‘‘दोन एकरातील सोयाबीन काढणीला आले असून पंधरा...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
किसान रेल्वे धावो सुसाट तुमची उमटलेली पाऊले नेहमी आत्मविश्वासपूरक आणि...
कोरोनाचे विदारक वास्तवभारतात ३० जानेवारी २०२० ला केवळ एक कोरोनाबाधित...
एका शोकांतिकेचे पुनरावर्तनदेशात एप्रिलपासून उन्हाळ कांद्याचा आवक हंगाम सुरू...
हा तर विश्वासघात!खरे तर जून ते सप्टेंबर या काळात कांद्याचे दर थोडे...
`अॅक्शन प्लॅन’ करेल काम!  मागील महिनाभरापासून विदर्भातील संत्रा उत्पादक...