agriculture news in Marathi, agrowon, for Agri Business Degree The ICAR Committee | Agrowon

अॅग्री बिझनेस पदवीसाठी 'आयसीएआर'ची समिती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे : देशातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाला मान्यता देण्यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे विद्यार्थ्यांची जोरदार बाजू मांडली आहे. याबाबत एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय आता परिषदेने घेतला आहे.  

महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांकडून कृषी व्यवसाय व्यवस्थापन (अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट) पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. सध्या एक हजाराहून जास्त विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआरने मात्र या अभ्यासक्रमाला व्यावसायिक सूचित समावेश करण्यास नकार दिला होता. 

पुणे : देशातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाला मान्यता देण्यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे विद्यार्थ्यांची जोरदार बाजू मांडली आहे. याबाबत एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय आता परिषदेने घेतला आहे.  

महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांकडून कृषी व्यवसाय व्यवस्थापन (अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट) पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. सध्या एक हजाराहून जास्त विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआरने मात्र या अभ्यासक्रमाला व्यावसायिक सूचित समावेश करण्यास नकार दिला होता. 

भारतीय कृषी संशोधन संस्थेत (आयएआरआय) देखील अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. याशिवाय पाच राज्यांमध्ये विविध नावाने हा अभ्यासक्रम चालू असताना आयसीएआरने व्यावसायिक सूचीत या अभ्यासक्रमाचा समावेश न करणे चुकीचे आहे, असा मुद्दा श्री. पवार यांनी मांडला आहे. आयसीएआरचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांच्याशी प्रत्यक्ष झालेल्या चर्चेत श्री. पवार यांनी विद्यार्थ्यांची बाजू प्रभावीपणे मांडली.

अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट पदवीबाबत श्री. पवार यांनी लक्ष वेधल्यानंतर आता कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनीदेखील आयसीएआरला पत्र लिहून मान्यता देण्याची विनंती केली आहे. "आयसीएआरने श्री. पवार यांच्या मुद्यांची दखल घेतली असून, एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आयसीएआरच्या महासभेत मांडला जाईल व अॅग्री बिझनेस पदवीला मान्यता मिळेल," अशी माहिती सूत्रांनी दिली.

कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी पाठपुरावा सुरूच 
माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून राज्यातील कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी अजूनही पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश न देण्याच्या निर्णयाविरुद्ध संतप्त विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपूर्वी श्री. पवार यांची भेट घेतली होती. कृषिमंत्री श्री. फुंडकर यांच्याशी संपर्क साधून मुलांच्या बाजूने तुम्ही भूमिका घ्या, असा आग्रह श्री. पवार यांनी धरला होता. "विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासाठी श्री. पवार यांच्यामुळे आता राज्यपाल, कृषिमंत्री व विद्यापीठांमध्ये बैठका होणार असून मार्ग निघण्याची आशा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...