औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन

कृषी प्रदर्शन
कृषी प्रदर्शन

पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व माहितीचे पर्वणी ठरणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन २७ ते ३० डिसेंबरदरम्यान औरंगाबादमध्ये होत आहे.  ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक विविधांगी ज्ञानाची शिदोरी समजली जाते. यंदा मराठवाड्यासह अनेक भागांत दुष्काळ आहे. शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्नदेखील ‘अॅग्रोवन’कडून प्रदर्शनाच्या निमित्ताने होत आहे. औरंगाबादच्या बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर हे प्रदर्शन भरणार आहे.  ‘अॅग्रोवन’कडून यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनामुळे हजारो शेतकऱ्यांना शेतीमधील समस्यांशी लढण्याचे बळ मिळाले आहे. आधुनिक शेतीची तंत्र प्रात्यक्षिकांसह समजण्यास या प्रदर्शनाचा उपयोग होत असल्यामुळे शेतकऱ्यांना ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनानंतर नवे प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळते. औरंगाबादच्या कृषी प्रदर्शनात बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीमधील उपायांवर मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न ‘अॅग्रोवन’चा आहे. शेतकऱ्यांना यानिमित्ताने शास्त्रज्ञ, अभ्यासकांची प्रत्यक्ष भेट होईल. विविध कंपन्यांची उत्पादने तसेच नवतंत्रांची ओळख होणार आहे.  या प्रदर्शनाला विशेषतः मध्य महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत. शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्डस्टोअर उद्योग, ड्रीप, टिश्युकल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.  'लढा दुष्काळाशी’ चर्चासत्रे औरंगाबादमध्ये चार दिवस भरणाऱ्या या कृषी प्रदर्शनात विशेष चर्चासत्रे होणार आहेत. त्यात  ‘लढा दुष्काळाशी’ या संकल्पनेवर आधारित चर्चासत्रे होत असून विविध कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अभ्यासक व प्रयोगशील शेतकरी यात सहभागी होतील. त्यातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या वाटा शोधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्टॉल बुकिंगसाठी... राज्यातील हजारो प्रयोगशील शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याची संधी असलेल्या ‘अॅग्रोवन’च्या या कृषी प्रदर्शनात स्टॉल बुकिंगसाठी इच्छुकांना गणेश भवर ९०११०३००४५ व अत्तार खान ९९२११९९६६३ यांच्याशी संपर्क साधता येईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com