agriculture news in Marathi, agrowon, Agriculture business based development Center at Baramati Agricultural College | Agrowon

शेतीआधारित उद्योगनिर्मितीचे बारामती कृषी महाविद्यालयात केंद्र
ज्ञानेश्र्वर रायते
रविवार, 6 मे 2018

बारामती, जि. पुणे : केंद्रीय निती आयोगाने ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी व स्वच्छतेत जागतिक दर्जाची गुणवत्ता आणण्यासाठी देशभरात ७२ संस्थांना अटल इनक्युबेशन सेंटर्स उभारण्यास मंजुरी दिली. देशात शेतीसाठी दोनच संस्थांना मंजुरी दिली, असून त्यात बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे. या महाविद्यालयात शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान उद्योगामध्ये रुपांतरीत करणारे जागतिक दर्जाचे हे केंद्र बनेल.

बारामती, जि. पुणे : केंद्रीय निती आयोगाने ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी व स्वच्छतेत जागतिक दर्जाची गुणवत्ता आणण्यासाठी देशभरात ७२ संस्थांना अटल इनक्युबेशन सेंटर्स उभारण्यास मंजुरी दिली. देशात शेतीसाठी दोनच संस्थांना मंजुरी दिली, असून त्यात बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे. या महाविद्यालयात शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान उद्योगामध्ये रुपांतरीत करणारे जागतिक दर्जाचे हे केंद्र बनेल.

निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमार्फत २०१७-१८ या वर्षात भारतात उभारण्यात येणाऱ्या अटल इनक्युबेशन सेंटर्सची घोषणा शुक्रवारी (ता.४) कार्यकारी संचालक रमणन रामानाथन यांनी केली. यामध्ये महाराष्ट्रातील १२ संस्थांचा समावेश आहे. शेती विषयावर मात्र देशात महाविद्यालय म्हणून फक्त बारामतीच्याच कृषी महाविद्यालयाचा समावेश केला असल्याने निती आयोगानेही बारामतीतील शेतीच्या तंत्रज्ञान प्रसाराची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली आहे. यासाठी देशभरातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते.   

या सेंटरमध्ये उद्योजक विद्यार्थ्यांना उद्योगाच्या कल्पना व नवे तंत्रज्ञान सादर करता येतील. यासंदर्भातील व्यवहारीक चाचण्या घेणे आणि प्रत्यक्षात उद्योगात रूपांतर करण्यासाठी हे सेंटर प्रोत्साहन व पाठबळ देणार आहे. त्यांच्याकडील तंत्रज्ञान उद्योगामध्ये परावर्तीत करण्यासाठी कृषी महाविद्यालयातील व जागतिक दर्जाचे इतर तज्ज्ञ मार्गदर्शन व तसे उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन येथे मिळेल. जागतिक दर्जाच्या संशोधन केंद्राशी हे केंद्र संलग्न असेल व जगभरातील शेतीपूरक नव्या तंत्रज्ञानाची देवाणघेवाणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

५ फेब्रुवारी रोजी झाले सादरीकरण
निती आयोगाच्या निवड समितीसमोर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी या नियोजित केंद्रासाठी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सादरीकरण केले. आता या नव्या सेंटरमध्ये महाविद्यालयातील प्रा. जया तिवारी, प्रा. सोनाली सस्ते, प्रा. श्रीकांत कर्णेवार, प्रा. अमित काळे, प्रा. दादा पाटील व प्रा. चंद्रशेखर शेंडे हे प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

महाराष्ट्रातील या संस्थांचा आहे समावेश
१. कृषी महाविद्यालय बारामती. २. एम.आय.टी.ए.डी.टी. विद्यापीठ पुणे ३. पिनॅकल इंडस्ट्रीज पुणे ४. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ठाणे, ५. अलॅक्रिटी इंडिया पुणे. ६. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे. ७. व्हनजीज टेक्नॉलॉजीज प्रा. लि. नाशिक ८. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च पुणे. ९. अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स प्रा. लि. पुणे. १०. ब्रीक ईगल मुंबई, ११. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, १२. सीटी इन साईन लॉयलिटी मुंबई.

शेतीत उद्योजक निर्मितीसाठी 
हे केंद्र आश्वासक ठरेल

निती आयोगाने देशातील एकमेव कृषी महाविद्यालयाची दखल घेतली, यामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. ट्रस्टने नेहमीच शेती व शेतीआधारीत नव्या तंत्रज्ञानासाठी एक पाऊल पुढेच ठेवले. आताही महाविद्यालयात उभारले जाणारे सेंटर शेती व शेतीपूरक व्यवसायात व नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यात तसेच शेतीपूरक व्यवसायाची गुणवत्ता वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आहे. यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू, असे प्रतिक्रिया अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे.

निती आयोगाने या सर्व 

संस्थांना मंजुरी दिली. जागतिक दर्जाच्या भौतिक सुविधा व स्टार्टअप ज्या आपल्याला गरजेच्या आहेत, त्या अधिक गुणवत्तेनुसार वाढ करण्यासाठी उत्तेजन द्यायचे आहे. भारतातील सर्व राज्यातील त्या-त्या क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामध्ये या केंद्रांमुळे गुणवत्तापूर्ण वाढ करता येणार आहे. 
- रमणन रामानाथन, कार्यकारी संचालक निती आयोग, 
अटल इनक्युबेशन सेंटर

 

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...