आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
इव्हेंट्स
पोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्घाटन
औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी प्रदर्शनाला शुक्रवारपासून येथील जबिंदा ग्राउंडवर प्रारंभ होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी होत असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन दुपारी चार वाजता प्रदर्शनस्थळी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा खजिना असणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन औरंगाबाद येथील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होत आहे. पारस ग्रुप हे मुख्य प्रायोजक आहेत. महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ॲक्मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), पूर्वा केमटेक, गरवारे टेक्निकल फायबर्स आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) हे सहप्रायोजक आहेत.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसाय दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चालला आहे. उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे पोपटराव पवार व कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्याकडून या आव्हानासह विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, ठिबक व तुषार सिंचन, टिश्यूकल्चर, ग्रीन हाउस टेक्नॉलॉजी आणि इम्प्लिमेंट्स, कृषी साहित्य ग्रेडिंग, वेइंग, सॉर्टिंग अवजारे उत्पादन क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
मधमाशीपालनाचे भव्य दालन
पूर्वा केमटेकद्वारे प्रदर्शनामध्ये मधमाशी पालनाचे भव्य दालन उभारण्यात येणार आहे. या दालनामध्ये मधमाशीपालनाचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार असून, या ठिकाणी विविध पेट्यांची केलेली मांडणी शेतकऱ्यांना पर्वणी ठरणार आहे.
प्रवेश निःशुल्क, बक्षिसे जिंकण्याची संधी
सकाळ - ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र सर्व शेतकऱ्यांची नावनोंदणी केली जाणार आहे. या नोंदणीतून दररोज ड्रॉ काढण्यात येणार असून, यातून शेतकऱ्यांना रोहित ॲग्रोद्वारे पेरणी यंत्र, ॲण्डसलाइटद्वारे बॅटरी, लोकनेते इंजिनिअरिंगकडून नांगर जिंकण्याची संधी आहे.
- 1 of 5
- ››