ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी विद्यापीठ

ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी विद्यापीठ
ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी विद्यापीठ

पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी विद्यापीठ असून, ॲग्रोवनशिवाय शेतकरी अपूर्णच असल्याच्या भावना राज्यभरातील शेतकऱ्यांनी, कृषी तज्ज्ञांनी तसेच शेतकरी नेत्यांनी व्यक्त केल्या. निमित्त होते ॲग्रोवनच्या तेराव्या वर्धापन दिनाचे. तेरा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या जगातील एकमेव कृषी दैनिकावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

ॲग्रोवन आज चौदाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी पूर्णपणे काम करणारे, शेतकऱ्यांच्या यशोगाथा देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे एकमेव कृषी दैनिक म्हणजे अॅग्रोवन. अॅग्रोवनच्या टीमला यशस्वी चौदाव्या वर्षात पदार्पणाकरिता शुभेच्छा. - विठ्ठल धांडे, कृषी सहायक, मेहकर, जि. बुलडाणा

ॲग्रोवनने शेतीमध्ये जिवंतपणा अाणला. अजून खूप मोठा विस्तार व्हायला हवा. ग्रामीण भागात ॲग्रोवन सर्वत्र पोचला पाहिजे. शेतकऱ्यांनीसुद्धा इतर बाबींसाठी वार्षिक खर्चाचे नियोजन करताना त्यात ॲग्रोवनसाठी काही तरतूद करीत एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तो नियमित वाचायला हवा.  - श्याम गट्टाणी , अध्यक्ष, सीताफळ महासंघ, पुणे

राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेलं आणि आक्रमकपणे सातत्याने बळिराजाची बाजू मांडणाऱ्या दैनिक सकाळ-अॅग्रोवनला १४ व्या वर्षात पदार्पण झाल्याबद्दल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. - आमदार सतेज पाटील, कोल्हापूर

अॅग्रोवनमधून एखाद्या विषयाचा शोध घेऊन संकलित केलेली माहिती योग्य पद्धतीने सादर केली जाते. तांत्रिक माहिती देखील सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोचत आहे. परिपूर्ण, संशोधनत्मक माहिती मुळे शेतकऱ्यांमध्ये अॅग्रोवनविषयी विश्वासनीयता निर्माण झाली आहे. अॅग्रोवनच्या आगामी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. - डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू,  कुलगुरू, वनामकृवि, परभणी.

देशातील जमिनीचे आरोग्य बिघडत चाललेले असताना शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अॅग्रोवनतर्फे यंदाचे वर्ष जमीन सुपीकता वर्षे म्हणून साजरे केले जात आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जे काम सरकार करू शकत नाही, ते काम अॅग्रोवनमुळे प्रभावीपणे होईल. अॅग्रोवनला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. - नरेश शिंदे, शेतकरी, सनपुरी

ॲग्रोवनमधील यशोगाथा वाचून शेतकऱ्यांमधून उद्योजक घडले. यशोगाथांपासून प्रेरणा घेत अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडला आहे. शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने मित्र असलेल्या अग्रोवनला वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा. - प्रल्हाद बोरगड, अध्यक्ष, सूर्या फार्मर्स प्रोड्युर्स कंपनी, सातेउफळ, जि. हिंगोली.

जगामधील एकमेव मराठी भाषिक कृषी दैनिक असलेल्या अॅग्रोवनचा पहिल्या अंकापासून वाचक आहे. अॅग्रोवनमुळे जगभरातील नवीन कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचत आहे. कृषी विद्यार्थ्यांना देखील अॅग्रोवन अतिशय उपयुक्त ठरत आहे. अॅग्रोवनला पुढील वाटचालीस शुभेच्छा. - प्रा. डाॅ. कल्याण आपेट, वनामकृवि, परभणी.

दै. अॅग्रोवन वाचून...मेकॅनिकचा शेतकरी झालो...त्याच दैनिकातून शेतीविषयक तंत्रज्ञानाचा वापर करून...उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी झालो...शेतकरी बांधवांचा हितचिंतक, मार्गदर्शक दै. अॅग्रोवनच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व टीम अॅग्रोवन व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा.  -  नाना पाटील, अॅग्रोवन उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्काराचे मानकरी, पिंप्री, ता. चाळीसगाव

अनेक मुद्दे ॲग्रोवनने मार्गी लावले. सकाळ समूहाने मोठे काम शेतकऱ्यांसाठी केले आहे. शेतीसंदर्भातील चुकीचे निर्णय ॲग्रोवनमुळे समोर आणता येतात. सरकारवर अंकुश ठेवता येतो.  - प्रकाश पाटील, पढावड, जि. धुळे

ॲग्रोवनची शेतीसाठी सुरू असलेली मोहीम अशीच सुरू राहावी. कापूस व इतर अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत.  - दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, जि.नंदुरबार

ॲग्रोवनला तेराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. खूप काम ॲग्रोवन परिवाराने केले आहे. यापुढेही शेतीची मोहीम सुरू ठेवावी. - नरेंद्र पाटील,  सदस्य, विस्तार शिक्षण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ

ॲग्रोवन शेतकरी, कष्टकरी, कामगारांचा तर मार्गदर्शक झाला आहेच; पण शेतकरी नेते, कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करत आहे. शेतकरी चळवळीला बळ देण्याचे, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी लढा देणाऱ्या संघटनांना पाठबळ देण्याचे काम ॲग्रोवन करत असून वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा. - बाळासाहेब पटारे,  विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना, नगर 

शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर शेती करण्याचे धडे देतानाच प्रयोगशील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या यशकथा समाजासमोर आणण्याचे मोठे काम ॲग्रोवन करत आहे. शेतीतला खरा आणि एकमेव ॲग्रोवन मार्गदर्शक आहे. ॲग्रोवनमुळे अनेक शेतकरी शेती प्रयोगात यशस्वी झाले आहे. वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. - अजय महाराज बासरस्कर,  प्रदेशाध्यक्ष, वारकरी संघटना, महाराष्ट्र 

ॲग्रोवन आज १४ व्या वर्षांत पर्दापण करत आहे, खूप खूप अभिनंदन. कृषी विज्ञान विस्ताराच्या कार्यात "ॲग्रोवन''चे नेहमीच एक पाऊल पुढे राहिले आहे. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना, तज्ज्ञ, शेतकऱ्यांना ॲग्रोवन ज्ञानवर्धक आणि ऊर्जावर्धक ठरला आहे. ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं, बोलतं कृषी विद्यापीठ आहे. कृषी विज्ञान विस्तार क्षेत्रातील दीपस्तंभ आहे. ॲग्रोवनला शुभेच्छा. -आनंद कोठाडिया, कृषिरत्न, जेऊर, ता. करमाळा

शेती आणि शेतकऱ्यांसाठी सलग १३ वर्षे अविरत कार्यरत असलेल्या "ॲग्रोवन''ला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, ॲग्रोवनमुळे शेतकऱ्यांना एक दिशा मिळाली. आजच्या शेतीची यशस्वी वाटचाल ॲग्रोवनशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ॲग्रोवनला पुढील कारकिर्दीस शुभेच्छा. -सुरेश वागधरे,  कृषिभूषण, माळीनगर-अकलूज, जि. सोलापूर.

"प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचनातून मलाही शेतीमध्ये नवे करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानुसार शेतीच्या व्यवस्थापनात बदलावर भर दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात केलेल्या प्रयोगाचे सरसकट अनुकरण करण्याऐवजी आपल्या भागासाठी त्यातील कोणते तंत्रज्ञान फायद्याचे ठरेल, यावर मंथन करून नंतरच ते तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. अशा प्रकारची जाणीव निर्माण करण्यात ॲग्रोवनचे मोठे योगदान राहिले आहे.  - श्रीकृष्ण ठोंबरे, कान्हेरी सरप, जि. अकोला

"कृषी विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यामध्ये दुवा बनण्याचे काम ॲग्रोवनने केले आहे. जमीन सुपीकता वर्ष ॲग्रोवनने जाहीर करून आपली सामाजिक बांधीलकीदेखील सिद्ध केली. जमिनीचे आरोग्य राखले गेले तरच यापुढे उत्पादकतेचा उद्देश साध्य होणार आहे. त्याकरीता ॲग्रोवनने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. जमिनीविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आल्यास पोत राखता येईल. जमिनीसोबतच पाण्याच्या संवर्धनाचा मुद्दा ॲग्रोवनने प्रकर्षाने मांडावा, अशी अपेक्षा आहे. '' - डॉ. नितीन कोंडे,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला  

फुलपाखराप्रमाणे ॲग्रोवनचे काम  "फुलपाखरू ज्या प्रमाणे फुलातील केवळ मकरंद ओढतात, त्याच प्रकारे ॲग्रोवन समाजातील घडणाऱ्या आणि त्यातही विशेषतः शेतीक्षेत्रात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी प्रकाशित करून त्या चांगल्या गोष्टींचा राज्यभर प्रसार करतो. ॲग्रोवनचे हे कार्य निश्‍चितच समाजाला नवी दिशा देणारे आहे. शेतकऱ्यांच्या यशोगाथा सकारात्मक पत्रकारितेचा सर्वोच्च मानबिंदू ठरला आहे. बांधावरच्या हिरोंना राज्यभर तीदेखील पूर्ण पान प्रसिद्धी दिली जाते. विस्तार क्षेत्रात नवा कीर्तिमान ॲग्रोवनने प्रस्थापित केला असून, ॲग्रोवनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. - रवींद्र ठाकरे,  प्रकल्प समन्वयक एन.डी.डी.डी.बी., नागपूर.  

शेतकऱ्यांचा खरा मार्गदर्शक "कृषी संशोधक संस्थांच्या कृषी विस्ताराबाबत मर्यादा असल्याचे सांगितले जाते. सातत्याने रिक्‍त पदांचा राग शासकीय संस्था विस्तारातील अपयशानंतर आवळतात. कृषी विस्ताराच्या बाबतीत निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्याचे काम ॲग्रोवनने केले आहे. बांधावरील तंत्रज्ञानासोबतच शेतीला पूरक जे काय असेल ते बेधडक पोचविण्यात या दैनिकाचा हातखंडा आहे. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत हे दैनिक बनले आहे.'' - डॉ. गजानन ढवळे, शिरपूर जैन, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com