वाफसा उडून गेल्यावर पेरणी करण्याचा राज्यकर्त्यांचा धंदा

शिरूर ः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनातील सभेवेळी मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार.
शिरूर ः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनातील सभेवेळी मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार.

शिरूर, जि. पुणे  ः वाफसा उडून गेल्यावर पेरणी करायची, असला धंदा राज्यकर्त्यांचा चालू आहे. भाजप व शिवसेना एकाच माळेचे मणी असून, जनतेला वेड्यात काढून छुप्या युतीतून त्यांचा भुलभुलय्या चालू आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तसेच फसवणूक व लुबाडणूक करणारे पुन्हा येतील; पण त्यांना आता भुलू नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाची पुणे जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा मंगळावारी (ता. १०) येथील पाबळ फाटा मैदानावर झाली. या वेळी अजित पवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातील अनेक भागात वाहतुकीचे तीनतेरा वाजलेत. पुणे-शिरूर रस्त्यावरील वाहतूक नियोजन कोलमडले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दिवसाढवळ्या खून होत आहेत. 

भ्रष्टाचाराने बरबटलेली बरीच मंडळी शासनात जाऊन बसल्याने राज्याचे वाटोळे चालले आहे. नाकर्ते लोक व चुकीच्या प्रवृत्ती शासनात आल्यावर काय होते, हे सर्व जनता पाहात आहे. आम्ही १५ वर्षे राज्य चालवले; पण कुठल्याही घटकाला काहीही कमी पडू दिले नाही. आम्ही सुरळीत बसविलेली राज्याची घडी पार विस्कटून टाकल्याचे श्री. पवार म्हणाले.’

तत्पूर्वी न्हावरे फाटा येथे अजित पवार यांच्यासह डी. पी. त्रिपाठी, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ, खासदार सुप्रिया सुळे या नेत्यांनी  मोटारसायकल रॅली काढली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com