हरभरा बियाणे विक्रीप्रकरणी विक्रेते न्यायालयात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : शासनाचे अनुदानित हरभरा बियाणे विक्रीतील घोळप्रकरणी विक्रेत्यांना कृषी यंत्रणांनी नोटिसा बजावल्या आहेत. याविरुद्ध जिल्ह्यातील सुमारे १०८ विक्रेत्यांनी सामूहिकरीत्या न्यायालयात धाव घेतली असून, येत्या शुक्रवारी (ता. २२) यावर सुनावणी होणार आहे.

विक्रेत्यांनी दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आणि महाबीज प्रशासनाला बाजू सादर करण्याचे सांगितल्याचे समजते.

गेल्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यात हरभरा बियाणे वितरित केले गेले. त्या वेळी बाजारात हरभऱ्याचे दर वाढलेले असल्याने काहींनी बियाण्याचा हरभरा थेट खुल्या बाजारात विक्री केल्याचे समोर आले होते. शिवाय बियाणे पुरवठादार संस्थांनी अधिकचे देयक सादर केल्याची बाबसुद्धा समोर आली होती.

दरम्यान कृषी विभागाने विक्रेते, शेतकरी अशी सर्वांची चौकशी करून त्याचा अहवाल तयार केला आहे. कृषी विभागाने विक्रेत्यांना नोटिसा बजावत हरभरा बियाणे विक्रीची माहिती, तसेच त्यांची बाजू मांडण्याचे सुचविले होते.

त्यामुळे या विक्रेत्यांनी सामूहिकरीत्या याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी न्यायालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग तसेच महाबीज या यंत्रणांना बाजू सादर करण्याचे सुचविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com