पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी प्रश्‍न निकाली

पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी प्रश्‍न निकाली
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी प्रश्‍न निकाली

पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या चढ्या दराने टॅब खरेदीचा प्रश्‍न निकाली निघाल्याने पशुगणनेसाठीची टॅब खरेदी सुलभ झाली आहे. यामुळे लवकरच टॅब खरेदी हाेऊन रखडलेली २० व्या पशुगणनेला प्रारंभ हाेण्याचा विश्‍वास पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून व्यक्त हाेत आहे. गेल्या वर्षी जुलै ते आॅक्टाेबरदरम्यान हाेणारी पशुगणना टॅबअभावी रखडली हाेती.

केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले हाेते. मात्र, टॅब खरेदी दरातील गाेंधळ आणि माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडूनच टॅब खरेदीच्या अध्यादेशामुळे टॅब खरेदी रखडली हाेती. खुल्या बाजारात ५ हजार ३०० रुपये किमतीच्या टॅबची किंमत महाराष्ट्र आयटी महामंडळाने ११ हजार रुपये सांगितल्याने टॅब खरेदीचा प्रश्‍न निर्माण झाला हाेता. यामुळे आॅक्टाेबरअखेर हाेणारी पशुगणना अद्याप हाेऊ शकलेली नाही.

केंद्र शासनाने ‘इनाफ’ याेजनेअंतर्गत यंदाची २० वी पशुगणना टॅबद्वारे करण्याचा निर्णय देशपातळीवर घेतला. यासाठी केंद्र सरकार टॅब उपलब्ध करून देणार हाेते; मात्र नंतर राज्यांनी टॅब खरेदी करण्याचे सांगण्यात आले. टॅब खरेदीसाठी केंद्र शासन ६० टक्के निधी देणार हाेते. राज्याने ४० टक्के रक्कम द्यायची, असे ठरले हाेते. केंद्राने टॅब खरेदी करताना सहा हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेतील खरेदीसाठी परवानगी दिली.

महाराष्ट्राला ७ हजार २०० टॅबची आवश्‍यकता हाेती. यासाठीची प्रक्रिया पशुसंवर्धन विभागाने सुरू केली; मात्र एेन खरेदीच्या टप्प्यातच राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातूनच खरेदी करण्याचे आदेश काढले. या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाने महामंडळाकडे मागणी नाेंदविल्यानंतर महामंडळाने याच टॅबची रक्कम ११ हजार रुपये सांगितल्याने अडचण निर्माण झाली. हेच टॅब मध्य प्रदेश सरकारने पाच हजार तीनेशे रुपये दराने खरेदी केले. यामुळे टॅब खरेदीमध्ये सावळा गाेंधळ निर्माण झाला हाेता. 

'आयटी'कडूनच टॅब खरेदीचा अध्यादेश रद्द टॅब उपलब्धततेसाठी पशुसंवर्धन विभागाने उद्याेगांच्या सामाजिक दाियत्व याेजनेतून (सीएसआर) नाशिक येथील एका उद्याेगाकडेदेखील प्रयत्न केले हाेते. मात्र, उद्याेगाच्या कार्यक्षेत्रातच टॅबचा वापर व्हावा या अटीमुळे टॅब उपलब्ध हाेऊ शकलेले नाहीत. दरम्यान, आयटी महामंडळाकडूनच टॅब खरेदीचा अध्यादेश रद्द करण्यात आल्याने आता टॅब खरेदी हाेऊन २० व्या रखडलेल्या पशुगणनेला महिनाभरात प्रारंभ हाेईल, असा विश्‍वास पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून व्यक्त हाेत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com