एकात्मिक खत वापरातून शाश्वत सुपीकता : डॉ. अजितकुमार देशपांडे

एकात्मिक खत वापरातून शाश्वत सुपीकता : डॉ. अजितकुमार देशपांडे
एकात्मिक खत वापरातून शाश्वत सुपीकता : डॉ. अजितकुमार देशपांडे

रासायनिक खते आणि जमिनीची सुपीकता या बाबत अनेक उलटसुलट बाबी मांडल्या गेल्या आहेत. मात्र, भारतीय मृदाशास्त्र संशोधन संस्थेच्या भारतभर असलेल्या २८ शाखांमध्ये झालेल्या दीर्घकालीन शास्त्रीय प्रयोगानुसार शेणखत, कंपोष्ट खत आणि रासायनिक खतांचा शिफारशीनुसार वापर हेच जमिनीची सुपीकता टिकवण्यामध्ये उपयुक्त ठरत असल्याचे निष्कर्ष पुढे आल्याची माहिती मृदाशास्त्रज्ञ डॉ. अजितकुमारे देशपांडे यांनी दिली. ते अॅग्रोवन आयोजित चर्चासत्रामध्ये बोलत होते.    स्वातंत्र्यानंतर भारताचे कृषी उत्पादन हे केवळ ५३ दशलक्ष टन होते. १९७० पर्यंत त्यात ७० दशलक्ष टनापर्यंत वाढ झाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालामध्ये भारताची कृषी उत्पादकता न वाढल्यास उपासमारीचा धोका व्यक्त करण्यात आल्यानंतर मात्र देशपातळीवर हालचालींचा वेग आला. डॉ. बोरलॉग यांच्या सह डॉ. स्वामीनाथन यांच्यासह कृषी शास्त्रज्ञ कामाला लागले. त्यातून रासायनिक खते, संकरीत जाती यांच्या प्रसार सुरू झाला. त्यातून उत्पादनवाढीला चालना मिळाला. याला हरितक्रांती असे संबोधले गेले. आज भारताचे कृषी उत्पादन २७७ दशलक्ष टन असून, १२५ कोटी लोकांच्या अन्नसुरक्षेची सोय झाली.    पूर्वीपासूनच खतांच्या शिफारशीमध्ये कंपोस्ट खतांचे प्रमाणही सुरवातीला सांगितले जाई. पूर्वी साधी पिके होती, त्यामुळे त्यांच्याकडून मातीतून होणारी अन्नद्रव्याची उचलही तुलनेने कमी होती. मात्र, १९७० नंतर आलेल्या संकरीत जातींची मूलद्रव्यांची उचलही अधिक होती. उत्पादनासाठी संतुलित खतांचा पुरवठा करण्याची आवश्यकता वाढली. कालांतराने शेतकऱ्यांकडील जनावरांची संख्या कमी झाल्याने कंपोष्ट खतांचा वापर कमी झाला. त्याच अनुदानावर असल्याने युरिया स्वस्त होता. त्याच्या वापराने पिकावरील परिणामही त्वरित दिसत असल्याने शेतकऱ्यांकडून त्याचा वापर वाढत गेला. एका टप्प्यानंतर जमिनीतील सेंद्रिय कर्बाने नीचतम पातळी (१.० पासून ०.३ पर्यंत) गाठली. उत्पादनामध्ये घट होण्यास सुरवात झाली. पिकांची वाढ आणि जमिनीच्या सुपीकतेचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यासाठी एकात्मिक सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापरण्याची गरज आहे.

उपाययोजना ः

  • खते देण्यापूर्वी मातीची तपासणी केलीच पाहिजे. सध्या एक टक्क्यापेक्षा कमी शेतकरी नियमित मातीची तपासणी करतात. त्यासाठी जमिनीची आरोग्यपत्रिका हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
  • वास्तविक नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या वापराचे प्रमाण हे तृणधान्यासाठी २ः१ः१ आणि कडधान्यासाठी १ः२ असे असले पाहिजे. मात्र, महाराष्ट्रात हे प्रमाण ४ः१ः१ (काही ठिकाणी ३.५ः१.५ः१) असे आहे. म्हणजेच नत्राचा अनावश्यक वापर केला जातो.
  • पाण्याचा अतिरेकी वापर हेही जमिनी नापीक होण्याचे मुख्य कारण आहे. एखाद्या वर्षभराच्या पिकाला २० प्रवाही पाणी दिल्यास, त्यातून ७ टन क्षार जमिनीत जातात.
  • खताच्या व्यवस्थापनासाठी स्थान, पीक आणि जमीननिहाय शिफारशी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मोबाईल अॅप उपयुक्त ठरू शकते.
  • ठिबक द्वारे वापरण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर तुलनेने खर्चिक ठरतो. त्या ऐवजी पाण्यात विरघळणारी युरीया, अमोनियम नायट्रेट, पांढरा पोटॅश यासारखी खते देता येतील. स्फुरदाची पूर्तता करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा.
  • त्याच प्रमाणे पिकांतील (देठ, पाने, काड्या) अन्नद्रव्याचे प्रमाण प्रयोगशाळेतून मिळवले पाहिजे. म्हणजेच आपण दिलेली खते कितपत लागू पडली, याचा अंदाज मिळेल.
  • एक इंच सुपीक माती तयार होण्यासाठी सुमारे ४०० वर्षे लागतात. मात्र, एखादा जोराचा पाऊस झाल्यास ती वाहून जाण्यास एक दिवसही पुरेसा ठरतो. त्यामुळे बांधबंदिस्तीसह जल व मृद्संधारणाच्या उपाययोजना शेती व परिसरात करून घेणे आवश्यक आहे.
  • - डॉ. अजितकुमार देशपांडे, ९४२३३२५८७९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com