‘ॲग्रोवन’ ॲप सर्वोत्तम !

 ‘वॅन-इफ्रा’च्या वतीने जागतिक पातळीवर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये सकाळ, ॲग्रोवन आणि सरकारनामा यांना तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
‘वॅन-इफ्रा’च्या वतीने जागतिक पातळीवर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये सकाळ, ॲग्रोवन आणि सरकारनामा यांना तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

हैदराबाद : ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स`तर्फे (वॅन-इफ्रा) दिल्या जाणाऱ्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस'मध्ये सकाळ, ‘ॲग्रोवन’ आणि सरकारनामा यांनी बाजी मारली आहे. ‘ॲग्रोवन'चे मोबाईल ॲप्लिकेशन आणि 'सरकारनामा' या संकेतस्थळाला ‘सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप'साठीचा पुरस्कार मिळाला; तसेच डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये 'सकाळ माध्यम समूह' दक्षिण आशियात सलग दुसऱ्या वर्षी अग्रेसर ठरला आहे.   

‘ॲग्रोवन''च्या अनोख्या मोबाईल ॲप्लिकेशनमुळे कृषी क्षेत्रातील घडामोडी, बाजारभाव, नवे प्रयोग, महत्त्वाच्या बातम्या अशी विविध प्रकारची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचते. ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची बित्तंबातमी देणारे विश्वासार्ह संकेतस्थळ'' अशी www.sarkarnama.in ची अल्पावधीतच ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट छपाईसाठी ‘सकाळ''ला पुरस्कार मिळाला आहे.  हैदराबादमध्ये सुरू असलेल्या ‘वॅन-इफ्रा इंडिया'' परिषदेत झालेल्या सोहळ्यात ‘वॅन-इफ्रा''चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट पेरेग्ने आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेअरफेल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘सकाळ माध्यम समूहा''चे संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक संचालक श्रीराम पवार, पुणे आवृत्तीचे मुख्य बातमीदार संभाजी पाटील, मुख्य आर्टिस्ट सुहास कद्रे, बाळासाहेब मुजुमले, जयेश गायकवाड, नीलम कामठे यांनी पुरस्कार स्वीकारले.

तिसऱ्यांदा मिळाला मान जगभरातील उत्कृष्ट छपाई करणाऱ्या वृत्तपत्रांच्या समूहात ‘सकाळ''चा समावेश झाला आहे. यापूर्वी दोन वेळा ‘सकाळ''ने हा पुरस्कार पटकावला आहे. जगभरातून २० देशांतील १२१ वृत्तपत्रांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. प्रादेशिक भाषेत ''सकाळ''ने हा मानाचा पुरस्कार मिळविला. तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये ‘सकाळ माध्यम समूह'' नेहमीच अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वॉलिटी क्‍लब २०१८ ते २०२० या वर्षासाठी २० देशांतील ६७ प्रकाशनांच्या ५४ वृत्तपत्रांनी हा मानाचा पुरस्कार मिळविला. या वृत्तपत्रांना आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वॉलिटी क्‍लबचे दोन वर्षांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. ''वृत्तपत्र व्यवसायामधील संपादकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक विभागांमधील समन्वय'' या विषयावर ''वॅन इफ्रा''च्या परिषदेमध्ये गुरुवारी (ता.27) परिसंवाद झाला. या परिसंवादात ''सकाळ माध्यम समूहा''चे संचालक संपादक श्रीराम पवार, ''द हिंदू''चे संपादक मुकुंद पद्मनाभन, ''जागरण''चे कार्यकारी संचालक संदीप गुप्ता, ''हिंदुस्तान टाईम्स''चे कार्यकारी संचालक शरद सक्‍सेना सहभागी झाले होते.  अॅग्रोवन अँड्रॉईड अॅपमध्ये शेती विषयक भरपूर माहिती... ▪अॅप आजच डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा...▪ https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.agrowon Agrowon More Digital... www.agrowon.com www.facebook.com/AGROWON www.Twitter.com/AGROWON

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com