agriculture news in Marathi, Agrowon artist Pravin Takawale passes away in accident | Agrowon

अॅग्रोवनचे आर्टिस्ट प्रवीण ताकवले यांचे अपघाती निधन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे : ‘ॲग्रोवन’चे आर्टिस्ट प्रवीण ताकवले (वय ३०) यांचे मंगळवारी (ता. २१) रात्री राजस्थानातील नागौर-जोधपूर राष्ट्रीय महामार्गावरील नागडी गावाजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत अपघाती निधन झाले. ताकवले काश्‍मीर ते कोल्हापूर या सायकल भ्रमंती मोहिमेदरम्यान राजस्थानात गेले होते. ताकवले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.

पुणे : ‘ॲग्रोवन’चे आर्टिस्ट प्रवीण ताकवले (वय ३०) यांचे मंगळवारी (ता. २१) रात्री राजस्थानातील नागौर-जोधपूर राष्ट्रीय महामार्गावरील नागडी गावाजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत अपघाती निधन झाले. ताकवले काश्‍मीर ते कोल्हापूर या सायकल भ्रमंती मोहिमेदरम्यान राजस्थानात गेले होते. ताकवले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.

ताकवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जम्मू येथून १३ ऑगस्ट रोजी काश्‍मीर ते कोल्हापूर सायकल मोहिमेला सुरवात केली होती. या मोहिमेत एकूण आठ सायकलस्वार सहभागी झाले होते. ते मंगळवारी बिकानेरहून जोधपूरला चालले होते. ताकवले आणि त्यांचे तीन सहकारी रात्री नागडी गावाजवळील एका हॉटेलमध्ये जेवण करून पेट्रोल पंपावर ठेवलेल्या सायकली आणण्यासाठी चालत निघाले होते. तेव्हा चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव ट्रक रस्ता सोडून खाली घुसला आणि त्याने या चौघांना पाठीमागून धडक दिली. त्यात ताकवले जागीच ठार झाले; तर इतर तिघेजण जखमी झाले. पोलिसांनी जखमींना खिंवसर इस्पितळात दाखल केले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. 

ताकवले आठ वर्षांपासून सकाळ समूहामध्ये कार्यरत होते. अभिनव कला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या ताकवले यांचा उत्कृष्ट डिझायनर आणि लोगो आर्टिस्ट म्हणून लौकिक होता. तसेच ते उत्तम ट्रेकर, धावपटू, जलतरणपटू आणि सायकलपटू होते. त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धांत सहभाग घेतला होता. ते दोन वर्षांपूर्वी पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहिमेमध्येही सहभागी झाले होते. पर्यावरणरक्षण व आरोग्यसंवर्धनासाठी लोकांनी घरून कार्यालयात येण्या-जाण्यासाठी सायकलचा वापर करावा, यासाठी ताकवले यांनी सायक्लोथॉन ही मोहीमही सुरू केली होती. ते स्वतः कार्यालयात येण्या-जाण्यासाठी कटाक्षाने सायकलचा वापर करत. एक उमदा, मनमिळाऊ कलावंत आणि जिद्दी खेळाडू काळाने हिरावून घेतला, अशी हळहळ व्यक्त होत आहे.   

ताकवले यांचे पार्थिव आज (ता. २३) सकाळनंतर पुण्यात आणले जाणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

इतर बातम्या
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...