औरंगाबादेत ई-नाम प्रणाली अंतर्गतचे व्यवहार ठप्पच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : औरंगाबाद बाजार समितीमधील ई-नाम प्रणालीने शेतमाल खरेदीला लागलेला ब्रेक दुसऱ्या दिवशीही कायम होता. किरकोळ शेतमालाची आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली, तर जिल्हा उपनिबंधकांनी बंदविषयी दुपारनंतर चर्चेसाठी बोलावल्याची माहिती व्यापारी संघटनेने दिली.

दुपारपर्यंत बाजार समितीमधील ई-नाम प्रणालीअंतर्गत ठप्प पडलेल्या व्यवहारावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. औरंगाबाद बाजार समितीमधील व्यापारी संघटनेने ई-नाम प्रणालीसंदर्भात आपल्या मागण्यांविषयी बंद पुकारल्याने मंगळवारी (ता. ३) बाजार समितीमधील ई-नाम प्रणालीअंतर्गत संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. 

बुधवारी (ता. ४) याविषयी जिल्हा उपनिबंधकांनी चर्चेसाठी बोलविल्यानंतर मर्चंट असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्यात सर्व बाजार समित्यांमध्ये ई-नाम प्रणाली लागू कराल, तरच आम्हीही त्या प्रणालीनुसार काम करण्यास तयार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com