agriculture news in Marathi, agrowon, Be the best of all for the supply of quality seeds | Agrowon

दर्जेदार निविष्ठांच्या पुरवठ्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

अमरावती  ः येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची बियाणे, खते व किडनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये, याकरीता कृषी विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्‍त पीयूष सिंह यांनी केल्या. दर्जेदार बियाणे व कृषी निविष्ठांची उपलब्धता व्हावी याकरीता विभागीय गुणवत्ता नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अमरावती  ः येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची बियाणे, खते व किडनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये, याकरीता कृषी विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्‍त पीयूष सिंह यांनी केल्या. दर्जेदार बियाणे व कृषी निविष्ठांची उपलब्धता व्हावी याकरीता विभागीय गुणवत्ता नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अमरावती विभागाअंतर्गंत असलेल्या अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते. आयुक्त पीयूष सिंह म्हणाले, की खरीप हंगामात शेतकऱ्यांची बियाणे, खते व कीडनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये याकरिता कृषी विभागाने दक्ष राहण्याची गरज आहे. कृषी निविष्ठा तपासणीवेळी जागरूकतेने काम करणे अपेक्षित आहे. कृषी निविष्ठा खरेदीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला जावा, त्यांच्या अपेक्षा या माध्यमातून जाणून घेतल्या पाहिजेत. 

या हंगामात सर्व प्रकारच्या निविष्ठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने अनधिकृत निविष्ठांऐवजी अधिकृत व प्रमाणित निविष्ठांच्या वापराविषयी जागृती व्हावी. त्याच प्रयत्नाअंतर्गत आयोजित ही कार्यशाळा स्तुत्य असल्याचे पीयूष सिंह म्हणाले.

विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी अवैध निविष्ठांच्या नियंत्रणासाठी सर्वंच यंत्रणाचे सहकार्य उपलब्ध होते. त्याबाबत कोणीही शासंक राहू नये; अनधिकृत बियाणे व इतर निविष्ठांवरील कारवाईला वेग देणे गरजेचे आहे. शासनाने १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ग्राम स्वराज अभियान राबविण्याचे निश्‍चित केले आहे.

त्याअंतर्गत १ मे रोजी महाराष्ट्रदिनी कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांना देण्यात यावी. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी किसान कल्याण कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. कार्यशाळेला विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, रामेतीचे प्राचार्य उदयकुमार नलावडे, राजेश मेरगेवार, नितल पाटील यांची उपस्थिती होती.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...