agriculture news in Marathi, agrowon, Bitcoin Scheme case should give to the ED | Page 2 ||| Agrowon

बिटकॉइन स्कीम फसवणूक प्रकरण ईडीकडे देण्याचा विचार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई : राज्यात गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पाँझी स्कीम सुरू करून गुंतवणूकदारांना आकर्षित व्याज देण्याचे अामिष दाखवले. या अामिषाला बळी पडून लाखो गुंतवणूकदारांनी कोट्यवधीची गुंतवणूक करताच ही स्कीम बंद करून नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणी नांदेड आणि पुणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर क्राइम मार्फत केला जात असला, तरी घोटाळ्याची व्याप्ती विचारात घेता, हा तपास ईडीकडे देण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली.

मुंबई : राज्यात गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पाँझी स्कीम सुरू करून गुंतवणूकदारांना आकर्षित व्याज देण्याचे अामिष दाखवले. या अामिषाला बळी पडून लाखो गुंतवणूकदारांनी कोट्यवधीची गुंतवणूक करताच ही स्कीम बंद करून नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणी नांदेड आणि पुणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर क्राइम मार्फत केला जात असला, तरी घोटाळ्याची व्याप्ती विचारात घेता, हा तपास ईडीकडे देण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली.

गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पाँझी स्कीम सुरू करून अमित भारद्वाज व त्यांच्या प्रतिनिधींनी मुंबई, पुणे, नांदेड, कोल्हापूरसह राज्यातील लाखो गुंतवणूकदारांची सुमारे २ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याप्रकरणी विधानसभेत अ‍ॅड. राहुल कुल, संग्राम थोपटे, शरद सोनवणे आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले, गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पाँझी स्कीम सुरू करून अमित एम. कुमार भारद्वाज, अमोलकुमार थोंबाळे, बालाजी पांचाळ, राजू मोतेवार यांनी नांदेड येथील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाणे, नांदेड येथे फसवणुकीसह ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यामध्ये अमोलकुमार थोंबाळे यास अटक करण्यात आली. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. यातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज हा परदेशात राहत असून, त्याच्या विरुद्ध 'लुकआउट' नोटीस काढली जात आहे. तसेच पुणे येथील दत्तवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह एमपीआयडी कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आकाश संचेती यास अटक करण्यात आली आहे.

नोटबंदीच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक
देशात नोटबंदी लागू झाल्यानंतर पाँझी स्कीममध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली. व्याज दर जास्त देण्याचे अामिष दाखवल्यामुळे नागरिक बिटकॉइन स्कीम गुंतवणुकीकडे आकर्षित झाले. सिंगापूर येथे बसून अमित भारद्वाज हा नियंत्रण करीत होता. अभासी करन्सी बाजारात एजंटांनी नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. १० टक्के परतावा देण्याचा करार केला. स्वत:ची करन्सी निर्माण केली, परंतु या करन्सीला नगण्य मूल्य प्राप्त झाले. या गुन्ह्याचा तपास सर्वत्र सुरू असलातरी सायबर क्राइमसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. राज्य सरकार जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेल्या एकूण ३५ सायबर क्राइमची मदत घेत आहे. दोघांसाठी अटक वॉरंट काढण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने बीटकॉिनसारख्या क्रिप्टो करन्सीला मान्यता दिलेली नाही. परंतु ही करन्सी चलन बेकायदेशीर असल्याचेदेखील घोषित केलेले नाही. रिझर्व्ह बँकेने नागरिकांनी अशा करन्सीमध्ये गुंतवणूक न करण्यासंबंधी वेळोवेळी परिपत्रक काढले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ईडीकडे तपास देण्याचा विचार केला जाईल, असे रणजित पाटील यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
बोंडारवाडी धरणप्रश्नी मेढा येथे आंदोलनमेढा, जि. सातारा : बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे,...
ज्वारी उत्पादन यंदाही आतबट्ट्यातचनगर ः दोन वर्षं दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा...
जांभुळणी तलावाच्या कालव्याला गळतीखरसुंडी, जि. सांगली : जांभुळणी (ता. आटपाडी) येथील...
महिला शक्‍तीतूनच नवसमाजाची जडणघडण  ः...अमरावती  ः ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती...
सोलापूर जिल्ह्यातील पाच नळपाणी योजना...सोलापूर : प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी...
परभणी जिल्ह्यात फळबागेची ६३९ हेक्टरवर...परभणी : यंदा सिंचन स्त्रोतांना पाणी उपलब्ध आहे....
आंबेगाव तालुक्यात प्रतिकूल हवामानामुळे...निरगुडसर, जि. पुणे ः यंदा हवामानातील बदल व...
नगर जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर चारा...नगर : जिल्ह्यात यंदा पाण्याची बऱ्यापैकी...
जळगाव जिल्ह्यात तूर विक्रीबाबत ८००...जळगाव  ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...