कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या उद्योजकांचा ‘ॲग्रोवन’तर्फे सन्मान

कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या उद्योजकांचा ‘ॲग्रोवन’तर्फे सन्मान
कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या उद्योजकांचा ‘ॲग्रोवन’तर्फे सन्मान

पुणे   : जिद्द, कष्ट, अथक परिश्रमाच्या जोरावर व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत यशाचे शिखर पादाक्रांत करणाऱ्या आणि कृषी उद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील निवडक २७ कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ- ॲग्रोवन’च्या वतीने ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. २८) पुण्यात आयोजित समारंभात राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे.

कृषी क्षेत्राच्या उभारणीत, विकासात कृषी उद्योगक्षेत्राचा मोलाचा वाटा राहिला आहे. रासायनिक, सेंद्रिय व जैविक खते; तसेच बियाणे, कीटकनाशके, सूक्ष्म सिंचन, अवजारे, रोपवाटिका, पॅकेजिंग, सल्ला सेवा अशा अनेक क्षेत्रांत महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनी उद्योजकतेचा झेंडा रोवला आहे. महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात अग्रणी स्थान मिळवून देण्यामध्ये इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांबरोबरच या उद्योजकांचाही मोठा वाटा राहिला आहे. अशांपैकी काही निवडकांचा सन्मान या समारंभात करण्यात येणार आहे.      

ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड विजेते ः अकोला येथील निर्माण फर्टिलायझर्सचे गणेशराव देशमुख, मा दुर्गा प्लॅस्टिक प्रॉडक्ट्सचे संचालक पराग शहा, सांगली येथील नेचर केअर फर्टिलायझरचे जयंत बर्वे, अशोका ॲग्री सोल्युशन्सचे सतीश पाटील, औरंगाबाद येथील एलोरा नॅचरल सीड्सचे किशोर वीर, कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचे डॉ. संजय पाटील, महालक्ष्मी फर्टिलायझर्सचे सुरेश साळुंखे, साई शेती सेवा केंद्राचे सचिन पाटील, शैलेश नर्सरीचे सुबोध भिंगार्डे, कचरे हायटेक नर्सरीचे शिवाजी कचरे, पुणे येथील सुजलाम क्रॉप केअरचे मधुकर हेगडे, नामदेव उमाजी ॲग्रिटेकचे सचिन भालिंगे, मुंबईतील वेस्ट कोस्ट रसायनी इंटरनॅशनलचे डॉ. सतीश रहाळकर, नाशिक येथील ग्लोबल ग्रीन ॲग्रिनोव्हाचे बी. एस. मुर्थी, ड्रीप इंडिया इरिगेशनचे झुंबरलाल भंडारी, बोरस्ते ॲग्रो इम्पलिमेन्ट्सचे रमेश बोरस्ते, आनंद ॲग्रो केअरचे घनश्याम हेमाडे, रिचफिल्ड फर्टिलायझर्सचे स्वप्नील बच्छाव, कृषिदूत बायोहर्बलचे रामनाथ जगताप, मायक्रोबॅक्स इंडियाचे विकास राजूरकर, वेदांत ॲग्रोटेकचे शिवाजी थोरात, सोलापूर येथील मधुबन फार्म अँड नर्सरीचे नवनाथ कस्पटे, वर्धा येथील दफ्तरी ॲग्रोचे रवींद्र दफ्तरी आणि जळगाव येथील प्रश्लर बायो प्रॉडक्ट्सचे निखिल चौधरी, नगर येथील विघ्नहर पॅकेजिंग प्रॉडक्ट्सचे प्रभाकर काकडे, साताऱ्यातील शुअरशॉट इव्हेन्ट्सचे संदीप गिड्डे, साईबन ॲग्रो टुरिझमचे डॉ. प्रकाश कांकरिया.  पुरस्कार वितरण कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com