agriculture news in marathi, agrowon business excellence awards will distribute on wednesday, pune, maharashtra | Agrowon

कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या उद्योजकांचा ‘ॲग्रोवन’तर्फे सन्मान

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

पुणे   : जिद्द, कष्ट, अथक परिश्रमाच्या जोरावर व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत यशाचे शिखर पादाक्रांत करणाऱ्या आणि कृषी उद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील निवडक २७ कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ- ॲग्रोवन’च्या वतीने ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. २८) पुण्यात आयोजित समारंभात राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे.

पुणे   : जिद्द, कष्ट, अथक परिश्रमाच्या जोरावर व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत यशाचे शिखर पादाक्रांत करणाऱ्या आणि कृषी उद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील निवडक २७ कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ- ॲग्रोवन’च्या वतीने ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. २८) पुण्यात आयोजित समारंभात राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे.

कृषी क्षेत्राच्या उभारणीत, विकासात कृषी उद्योगक्षेत्राचा मोलाचा वाटा राहिला आहे. रासायनिक, सेंद्रिय व जैविक खते; तसेच बियाणे, कीटकनाशके, सूक्ष्म सिंचन, अवजारे, रोपवाटिका, पॅकेजिंग, सल्ला सेवा अशा अनेक क्षेत्रांत महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनी उद्योजकतेचा झेंडा रोवला आहे. महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात अग्रणी स्थान मिळवून देण्यामध्ये इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांबरोबरच या उद्योजकांचाही मोठा वाटा राहिला आहे. अशांपैकी काही निवडकांचा सन्मान या समारंभात करण्यात येणार आहे.      

ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड विजेते ः अकोला येथील निर्माण फर्टिलायझर्सचे गणेशराव देशमुख, मा दुर्गा प्लॅस्टिक प्रॉडक्ट्सचे संचालक पराग शहा, सांगली येथील नेचर केअर फर्टिलायझरचे जयंत बर्वे, अशोका ॲग्री सोल्युशन्सचे सतीश पाटील, औरंगाबाद येथील एलोरा नॅचरल सीड्सचे किशोर वीर, कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचे डॉ. संजय पाटील, महालक्ष्मी फर्टिलायझर्सचे सुरेश साळुंखे, साई शेती सेवा केंद्राचे सचिन पाटील, शैलेश नर्सरीचे सुबोध भिंगार्डे, कचरे हायटेक नर्सरीचे शिवाजी कचरे, पुणे येथील सुजलाम क्रॉप केअरचे मधुकर हेगडे, नामदेव उमाजी ॲग्रिटेकचे सचिन भालिंगे, मुंबईतील वेस्ट कोस्ट रसायनी इंटरनॅशनलचे डॉ. सतीश रहाळकर, नाशिक येथील ग्लोबल ग्रीन ॲग्रिनोव्हाचे बी. एस. मुर्थी, ड्रीप इंडिया इरिगेशनचे झुंबरलाल भंडारी, बोरस्ते ॲग्रो इम्पलिमेन्ट्सचे रमेश बोरस्ते, आनंद ॲग्रो केअरचे घनश्याम हेमाडे, रिचफिल्ड फर्टिलायझर्सचे स्वप्नील बच्छाव, कृषिदूत बायोहर्बलचे रामनाथ जगताप, मायक्रोबॅक्स इंडियाचे विकास राजूरकर, वेदांत ॲग्रोटेकचे शिवाजी थोरात, सोलापूर येथील मधुबन फार्म अँड नर्सरीचे नवनाथ कस्पटे, वर्धा येथील दफ्तरी ॲग्रोचे रवींद्र दफ्तरी आणि जळगाव येथील प्रश्लर बायो प्रॉडक्ट्सचे निखिल चौधरी, नगर येथील विघ्नहर पॅकेजिंग प्रॉडक्ट्सचे प्रभाकर काकडे, साताऱ्यातील शुअरशॉट इव्हेन्ट्सचे संदीप गिड्डे, साईबन ॲग्रो टुरिझमचे डॉ. प्रकाश कांकरिया. 
पुरस्कार वितरण कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...