agriculture news in Marathi, agrowon, Buy 54 thousand quintals of gram in the district | Agrowon

नगर जिल्ह्यात ५४ हजार क्विंटल हरभरा खरेदी
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 एप्रिल 2018

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ५ हजार पाचशे २५ शेतकऱ्यांकडून ५४ हजार ५२६ क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. अजून साधारण ७० हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ११ हजार ८५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. 

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ५ हजार पाचशे २५ शेतकऱ्यांकडून ५४ हजार ५२६ क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. अजून साधारण ७० हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ११ हजार ८५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये यंदा तुरीप्रमाणेच हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे. मात्र बाजारात व्यापारी दर्जा नसल्याचे सांगत हमीभावापेक्षा साधारण एक हजार रुपये कमी दराने हरभरा खरेदी करत असल्यामुळे तुरीप्रमाणेच हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी वाढली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये हमीदराने खरेदीसाठी हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये बारा केंद्रांवर खरेदी सुरू आहे.

जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर (८५ हजार ४५३ हेक्‍टर) हरभऱ्याचे पीक घेतले गेले असल्याने उत्पादनही चांगले निघाले आहे. एक-दोन ठिकाणचे अपवाद वगळता मनुष्यबळ आणि शेतकऱ्यांची अडचण समजून तूर खरेदी केंद्रांवरच हरभरा खरेदी केंद्रे सुरू आहेत. 

यंदा साधारण दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी होण्याची अपेक्षा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली आहे. आतापर्यंत ५,५२५ शेतकऱ्यांकडून ५४ हजार ५२६ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. तुरीप्रमाणेच हरभरा विक्रीसाठीही शेतकऱ्यांना अगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. आतापर्यंत ११ हजार ८५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्रासाठी बारदान्याची मागणी केलेली आहे. शनिवारपर्यंत बारदाना उपलब्ध झालेला नाही. बारदाना उपलब्ध न झाल्यास हरभरा खरेदीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...