agriculture news in Marathi, agrowon, Causes of heat rise in Satara Ginger planting decrease | Agrowon

साताऱ्यात उष्णतावाढीमुळे आले लागवड रखडणार
विकास जाधव
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सातारा  ः अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी आले लागवड उष्णतेत झालेल्या वाढीमुळे रखडणार आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून दरातील अस्थिरतेमुळे आले पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह दुष्काळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून आले पीक घेतले जाते. 
 

सातारा  ः अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी आले लागवड उष्णतेत झालेल्या वाढीमुळे रखडणार आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून दरातील अस्थिरतेमुळे आले पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह दुष्काळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून आले पीक घेतले जाते. 
 

आले पिकाच्या दरात अस्थिरता असताना देखील जिल्ह्यात आले पिकाची लागवड सातत्याने होत असते. यंदा दराच्या अस्थिरतेसह वाढलेली उष्णता, यामुळे संथगतीने आल्याची लागवड सुरू आहे. जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी आले लागवड करतात. या हंगामात नदीकाठी व कॅनॉलचे पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी आले लागवडीसाठी पूर्वमशागत सुरू झाली आहे.

जिल्ह्यात साधारणपणे २५०० हेक्‍टरवर आल्याची लागवड होते. मुहूर्तावर यातील सुमारे १५ ते २० टक्के आल्याची लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

वाढलेल्या तापमानात लागवड केलेल्या आल्याची उगवण उशिरा होते. तसेच, आल्याचे कोंब विकृत पद्धतीने वाढून उत्पादनावर परिणाम होतो. तसेच उत्पादनावर परिणाम होतो, त्यामुळे शेतकरी उशिराने लागवड करणे टाळतात. 

दरम्यान दरातील घसरणीमुळे गतवर्षीप्रमाणे या हंगामात आले पिकांच्या क्षेत्रात ४०० ते ५०० हेक्‍टरने घट होण्याचा अंदाज आहे. 

आले सध्याचे दर
 बियाण्याचे आले प्रतिगाडी  (५०० किलो) - १५ ते १८ हजार रुपये
 विक्रीचे आले प्रतिगाडी (५०० किलो) - ११ ते १२ हजार रुपये

‘आले लागवडीसाठी क्षेत्र तयार करून ठेवले आहे. सध्या उष्णता वाढल्याने लागवड करणे शक्‍य होणार नाही. उष्णता कमी झाल्यावर लागवड करणार आहे.’ 
- जयवंत पाटील, प्रगतशील शेतकरी, पाल, जि. सातारा 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
लाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...