agriculture news in marathi, agrowon, cooperative hospitals opening soon in nanded, osmanabd and kolhapur district | Agrowon

...लवकरच सहकारी रुग्णालये उभारणार !
मारुती कंदले
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

राज्यात मुंबई, सोलापूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत मागील अनेक वर्षांपासून सहकारी रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमार्फत रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा व सुविधा देण्यात येत आहेत.

मुंबईः राज्यात नागरिकांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत माफक दरात आणि दर्जेदार आरोग्यसेवा व सुविधा देण्याच्या हेतूने सहकारी तत्त्वावरील रुग्णालये सुरू करण्यासाठी सहकार खात्यात सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात नांदेड, उस्मानाबाद आणि कोल्हापूर या ठिकाणी ही रुग्णालये सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्हा सहकारी उपनिबंधकांकडे या रुग्णालयांची नोंदणीही झाली असून, सध्या त्यासाठी आवश्यक भागभांडवल उभारणीसाठी नागरिक, शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. राज्यात मुंबई, सोलापूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत मागील अनेक वर्षांपासून सहकारी रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमार्फत रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा व सुविधा देण्यात येत आहेत. मुंबई येथील सुश्रूषा सहकारी रुग्णालयाच्या धर्तीवर राज्यातील काही जिल्ह्यांत सहकारी रुग्णालय स्थापन करण्यास सहकार खात्याकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.

रुग्णालयांना राज्य सरकारमार्फत शासकीय भागभांडवल देण्यासंदर्भातील धोरण ठरविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच नागरिक, शेतकरी आदी घटकांकडून शेअर्स गोळा केले जात आहेत. नांदेड जिल्ह्यात स्थानिक डॉक्टर्सनी एकत्र येऊन रुग्णालय स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातही सहकारी रुग्णालय सुरू करण्याचा विचार आहे. सध्या हे रुग्णालय नोंदणीच्या प्रक्रियेत आहे.

 भांडवल उभारणीचे मोठे आव्हान
या सहकारी तत्त्वावरील रुग्णालयांपुढे भागभांडवल उभारणीचे मोठे आव्हान असणार आहे. रुग्णालयात पायाभूत, मूलभूत सुविधा, यंत्रसामग्री आदी बाबींसाठी मोठा निधी लागणार असल्याने राज्य सरकारकडून काही मदत देता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. मात्र, या प्रस्तावात आरोग्य विभागाच्या एका कक्ष अधिकाऱ्याने खोडा घातल्याची चर्चा आहे. सहकारी रुग्णालयांमुळे सरकारी मालकीच्या इतर रुग्णालयांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा नकारात्मक शेरा संबंधित अधिकाऱ्याने मारल्याचे सहकार खात्यातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. मात्र त्यामुळे रुग्णालयांना सरकारी भागभांडवल देण्यात कोणतीही आडकाठी येणार नसल्याचेही संबंधितांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...