वाशीममध्ये कापूस लागवड क्षेत्र घटण्याची शक्‍यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वाशीम  ः येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात तूर, सोयाबीन, मूग, उडीद या प्रमुख पिकांच्या लागवडीत मोठी वाढ होणार असून, कापसाचे क्षेत्र घटीची अपेक्षा आहे. ही बाब गृहीत धरीत जिल्हा कृषी विभागाने हंगामाचे नियोजन केले आहे. बोंडअळीच्या फटक्‍यामुळे यावेळी सुमारे साडेसात हजार हेक्‍टर कापूस क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.

जिल्हा प्रशासनाने हंगामासाठी चार लाख ६७०० हेक्‍टरचे नियोजन केले आहे. या क्षेत्रात प्रामुख्याने सोयाबीनचेच पावणेतीन लाख हेक्‍टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय तूर ६२००० हेक्‍टर, मूग १६ हजार, उडीद २० हजार तर तीळ दोन हजार आणि इतर पिके १२०० हेक्‍टर राहू शकतात. कपाशीचे क्षेत्र गेल्या वर्षी ३० हजार ९२१ हेक्‍टरपर्यंत गेले होते. यावेळी ते ७४२१ हेक्‍टरने घटून २३ हजार ५०० हेक्‍टरपर्यंत खाली येऊ शकते, असे गृहीत धरून इतर पिकांचे नियोजन करण्यात आले. 

एक लाख १ हजार क्विंटल बियाण्याची गरज वाशीम जिल्हा हा सोयाबीनसाठी सर्वाधिक पोषक समजला जातो. त्यामुळे जिल्ह्याचे क्षेत्र हे बहुतांश याच पिकाखाली राहते. हे लक्षात घेता हंगामासाठी ९२ हजार ८१२ क्विंटल सोयाबीन बियाणे लागेल अशी मागणी करण्यात आली आहे. सोबतच तुरीचे ४१८५ क्विंटल, कपाशी ५९२, मूग १२४८, उडीद १५६०, संकरीत ज्वारी ५२५, मका ७५, तीळ ४३ क्विंटल बियाणे लागणार आहे. सोयाबीनचे बियाणे बहुतांश घरगुती वापरले जाते. या जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे बदलाचे प्रमाण ४५ टक्के अपेक्षित धरण्यात आले.

खरिपासाठी ४५ हजार टन खत मंजूर जिल्ह्यातील पिकांची प्रामुख्याने गरज पाहता जिल्हा प्रशासनाने खत नियोजन केले. यात खरिपासाठी ४४ हजार टन खताची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून ४५ हजार ५१० मेट्रिक टनाचे आवंटन मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात प्रामुख्याने युरिया ११ हजार टन, डीएपी ८ हजार, एसएसपी ४५००, एमओपी ६०० व इतर खतांचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे १४ हजार मेट्रिक टन खत साठा उपलब्धसुद्धा झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com