agriculture news in marathi, agrowon, croploan ragistration status in satara | Page 2 ||| Agrowon

सातारा जिल्ह्यातील तीन लाखांवर कर्जमाफीसाठी अर्ज
विकास जाधव
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ४२ हजार ५७० शेतकऱ्यांनी याकरिता ऑनलाइन अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ४२ हजार ५७० शेतकऱ्यांनी याकरिता ऑनलाइन अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक असल्याने केंद्रावर गर्दी वाढू लागली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात सेतू कार्यालयासह महा-ई-सेवा केंद्रे, संग्राम, आपले सरकार अशी ९५० केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहे. या योजनेतील जाचक निकषांमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या योजनेतील निकषांत वारंवार बदल केल्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या संख्येत अनेकवेळा बदल झाला आहे. निकषांनुसार जिल्ह्यातील साडेतीन ते चार लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्‍यता असली तरी आकडा निश्‍चित झाला नसल्याने ऑनलाइन नोंदणी  किती शेतकऱ्यांची शिल्लक आहे, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट होत नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ४२ हजार ५७० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. यामध्ये तीन लाख सात हजार २१३ अर्ज पात्र असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा आदी तालुक्‍यांतील डोंगराळ भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे. या गावांमध्ये ‘रेंज’च्या अडचणींमुळे ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसल्याने येथे आलेल्या अनेक शेतकऱ्यांना फॉर्म भरण्यासाठी रात्र उजाडत आहे. इंटरनेट सेवा उपलब्ध असलेल्या ठिकाणी गेल्यावर तेथील गर्दी आणि ‘सर्व्हर डाउन’सारख्या तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

अनेक कर्जदार शेतकरी आजारी, वयोवृद्ध असून त्यांना उचलून केंद्रावर न्यावे लागत आहे. माहिती भरताना पती-पत्नीच्या बोटांचे ठसे द्यावे लागतात. सकाळी इंटरनेट सेवा विस्कळित राहत असल्याने रात्रभर ऑनलाइन फॉर्म भरण्याचे कामकाज सुरू असते. तांत्रिक अडचणींमुळे चार-चार फेऱ्या माराव्या लागत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.

अनेक कर्जदार मुंबईला असल्याने तेही फॉर्म भरण्यासाठी गावाकडे येत आहेत. फॉर्म भरण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून ४० ते ५० रुपये घेण्याचे प्रकार सुरू आहेत.

इतर ताज्या घडामोडी
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...
झेंडू उत्पादक प्रतिकूल हवामानामुळे...ढेबेवाडी, जि. सातारा   : पावसाळी हवामान...
नगर : शेतकऱ्यांना लष्करी अळीचा...नगर  ः खरिपात लष्करी अळीमुळे ७० टक्के...
सरकारची दादागिरी थांबवण्याची वेळ आली...नगर  : सरकार ‘ईडी’ आणि इतर संस्थांच्या...
शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मूलभूत...वणी, जि. यवतमाळ   ः सिंचन सुविधात वाढ...
भाजप, शिवसेना जनतेला फसवतेय ः अशोक...भोकर, जि. नांदेड   ः भाजप आणि शिवसेनेची...
कांदा दरात घसरणीने शेतकऱ्यांत तीव्र...नाशिक : गेल्या आठवड्यात कांदा बाजारात ४५०...
...तर देशातील वस्त्रोद्योग क्षेत्र...नाशिक : मोदी सरकार प्रादेशिक व्यापक आर्थिक...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कृषी आयुक्तांनी केली पीक कापणी...नगर  ः हमीदपूर (ता. नगर) येथे सुरू असलेल्या...
सोयाबीनची आवक सुरूनागपूर : बाजारात हंगामातील नव्या सोयाबीनची आवक...