कर्जमाफी : जनसुविधा केंद्र आज २४ तास सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची आज शुक्रवारी (ता. १५) अंतिम मुदत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा, आपले सरकार व सीएससी केंद्र हे २४ तास सुरू ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज भरून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज शुक्रवारी (ता. १५) या मुदतीच्या आत भरावेत. या तारखेनंतर मुदतवाढ मिळणार नाही, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ई-सेवा केंद्रे पुढील २४ तास सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

एक एप्रिल २००९ नंतर पुनर्रचना झालेल्या कर्जाचा समावेश कर्जमाफी योजनेत करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात बुधवार (ता. १३)पर्यंत २ लाख ५९ हजार २५९ शेतकरी कुटुंबांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झालेले आहेत. कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका, विभाग, जिल्हा पातळीवर समित्या गठीत केलेल्या आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आल्या तहसीलदार, सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. डोंगरे यांनी केले. दरम्यान कर्जमाफीमध्ये आपले नाव ऑनलाइन यादीत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी लिंक http://csmssy.in या संकेतस्थळावर जाऊन खात्री करावी. असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com