agriculture news in marathi, agrowon, dairy development fund, india | Agrowon

दुग्ध प्रक्रिया क्षमता वाढीसाठी १०८८१ कोटीं

कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली ः देशभरात दुग्ध प्रक्रियेच्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रक्रिया व साठवणीची समस्या या उद्योगापुढे आहे. त्यामुळे दुग्ध प्रक्रिया अाणि पायाभूूत सुविधा बळकट करुन प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १०८.८१ अब्ज रुपयांच्या दुग्ध प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधीला मान्यता दिली आहे. 

नवी दिल्ली ः देशभरात दुग्ध प्रक्रियेच्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रक्रिया व साठवणीची समस्या या उद्योगापुढे आहे. त्यामुळे दुग्ध प्रक्रिया अाणि पायाभूूत सुविधा बळकट करुन प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १०८.८१ अब्ज रुपयांच्या दुग्ध प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधीला मान्यता दिली आहे. 

दुग्ध प्रक्रिया अाणि पायाभूूत सुविधा उभारण्यासाठी २०१७-१८ ते २०२८-२९ या कालावधीसाठी १०८.८१ अब्ज रुपये निधी उभारण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अार्थिक व्यवहार समितीने नुकतीच मंजुरी दिली अाहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. 

मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या या निधीतून दूध शीतकरण आणि दुधातील भेसळ चाचणीसाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची साधने उभारून देशात दुधाची कार्यक्षम खरेदी यंत्रणेचे जाळे उभारण्यात येणार आहे. 

खरेदी यंत्रणा बळकट करण्याबरोबरच दुग्ध प्रक्रिया सुविधा निर्माण करणे आणि मूल्यवर्धित दुग्ध पदार्थांच्या उत्पादनांसाठीही सुविधा निर्माण करण्यात येणार अाहेत. निधी उभारण्यासाठी राष्ट्रीय कृषी अाणि ग्रामीण विकास बॅंकेकडून (नाबार्ड) राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ आणि राष्ट्रीय डेअरी विकास सहकारी संस्थेला ८०.०४ अब्ज रुपये कर्ज मिळणार अाहे. तर उर्वरित २०.०१ अब्ज रुपये शेवटचे कर्जदार असलेले दूध संघ, राज्य डेअरी फेडरेशन, मल्टिस्टेट दूध सहकारी संस्था, डेअरी कंपन्या अाणि राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या उपकंपन्यांकडून मिळतील, असे सूत्रांनी सांगितले. 

या निधीमधील १२० दशलक्ष रुपये राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ अाणि राष्ट्रीय दूध विकास सहकारी संस्था मिळून उपलब्ध करणार अाहेत. पशुसंर्वधन, डेअरी अाणि मत्स्योद्योग विभागाचा वाटा ८.६४ अब्ज रुपये निधी देणार आहे. 

असा उभा करणार निधी

  • नाबार्ड ः ८०.०४ अब्ज रुपये
  • दूध संघ, राज्य डेअरी फेडरेशन, मल्टिस्टेट दूध सहकारी संस्था, डेअरी कंपन्या अाणि राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या उपकंपन्या ः २०.०१ अब्ज रुपये
  • राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ अाणि राष्ट्रीय दूध विकास सहकारी संस्था ः १२० दशलक्ष रुपये
  • पशुसंर्वधन अाणि डेअरी अाणि मत्स्योद्योग विभाग ः ८.६४ अब्ज रुपये

इतर अॅग्रो विशेष
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...
कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेशाच्या सामाईक...पुणे  : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा...
शालेय विद्यार्थ्यांना मिळणार तांदूळ,...नगर ः शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील...
लॉकडाऊनमधून बियाणे उद्योग वगळलापुणे : शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा सुरळीत...
पुणे बाजार समितीत आज केवळ फळे, कांदा...पुणे: लॉकडाऊनमध्ये बाजार समित्यांमध्ये...
'कृषी'च्या सामाईक प्रवेश परिक्षेत...परभणी: महाराष्‍ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा...
संकटातही कंदरच्या शेतकऱ्यांकडून आखातात...पुणेः सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा) येथील...
मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी पावसाचा...पुणे : राज्यात पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे...
माल वाहतुक करणाऱ्या वाहनांवरील टोल...मुंबई ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...
राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...