संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

तूर खरेदीला मुदतवाढ देण्याची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई  : हमीभावाने तुरीच्या खरेदीसाठी राज्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली असून, निर्धारित मुदतीमध्ये तूर खरेदीसाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नोंदणी झालेल्या सर्व तूर खरेदीस ३१ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. राज्यमंत्री श्री. खोत यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. त्यांनी यात म्हटले, की शेतकऱ्यांची तूर खरेदीची मुदत १८ एप्रिल २०१८ पर्यंत आहे. खरेदी करण्यात येणारी तूर ठेवण्यासाठी सध्या गोदामांची उपलब्धता कमी आहे. नोंदणी केलेल्या २ लाख ५४ हजार २६५ शेतकऱ्यांची सुमारे २६ लाख क्विंटल तूर खरेदी करणे अद्यापपर्यंत बाकी आहे.

यामुळे १८ एप्रिलपर्यंतच्या मुदतीत आतापर्यंत नोंदणी झालेली तूर खरेदी करण्यात अडचणी येऊ शकतात. या अडचणी दूर करुन नोंदणी झालेली सर्व तूर खरेदी करण्यासाठी हमीभावाने तूर खरेदीला ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com