agriculture news in marathi, Agrowon, dr.Panjabrao Deshmukh agriculture university Vice Chancellor Final interview on 15th September | Agrowon

'पंदेकृवि' कुलगुरुपदासाठी १५ सप्टेंबरला अंतिम मुलाखत

गोपाल हागे
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून, शुक्रवारी (ता. १५) पाच उमेदवारांचे राज्यपालांकडे सादरीकरण होणार आहे. यानंतर कुलगुरुपदासाठी एका व्यक्तीचे नाव घोषित होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून, शुक्रवारी (ता. १५) पाच उमेदवारांचे राज्यपालांकडे सादरीकरण होणार आहे. यानंतर कुलगुरुपदासाठी एका व्यक्तीचे नाव घोषित होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

येथील विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरुपदाची १२ ऑगस्टला मुदत संपली असून, सध्या परभणी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे. नवीन कुलगुरूसाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली शोधसमिती काम करीत आहे. अर्ज मागविणे, पात्र उमेदवारांच्या मुलाखती अशी प्रक्रिया पार पडली असून, आता आलेल्या उमेदवारांमधून पाच नावे अंतिम करण्यात आली.

या उमेदवारांना शुक्रवारी राज्यपालांकडे सादरीकरण करावे लागणार आहे. अंतिम पाच व्यक्तींमध्ये अकोला येथील विद्यमान कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही. एम. भाले, यांच्यासह आयसीएआरचे एस. के. चौधरी, डॉ. एम. के. सिंग, दापोलीचे डॉ. मोहाळकर, अमरावतीचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले यांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालांनी बडतर्फ केले आहे.

या घटनेमुळे मराठी भाषिक व राज्यातील उमेदवाराला कुलगुरू म्हणून प्राधान्य देण्याची अनेकांनी मागणी केली आहे. काही जणांनी थेट राज्यपालांकडे मागण्यांचे निवेदन पाठविले आहे. त्यामुळे नवीन कुलगुरू निवडताना याचा विचार होतो किंवा नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

विदर्भातील ११ जिल्ह्यांचे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. नागपूर व अमरावती या दोन विभागांची पीकपद्धती वेगवेगळी असून, त्यादृष्टीने संशोधनाची दिशा देणे, शेतकऱ्यांना अपेक्षित तंत्रज्ञान पुरविण्याचे आव्हान नवीन कुलगुरूसमोर राहणार आहे. शिवाय विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कृषी शिक्षणाची झालेली परवड, घसरलेला दर्जा सुधारण्याचीही मोठी भूमिका कुलगुरू म्हणून नवीन व्यक्तीला पार पाडावी लागणार आहे.

त्यामुळेच आता शुक्रवारी होत असलेल्या राज्यपालांकडील मुलाखतीकडे विद्यापीठ व कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...