agriculture news in Marathi, agrowon, due to absence of the godown, gram shopping stoped | Agrowon

गोदामाअभावी वरुडमध्ये हरभरा खरेदी ठप्प
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018

अमरावती  ः खरेदी केलेल्या मालाच्या साठवणुकीसाठी गोदाम नसल्याच्या कारणामुळे हरभरा खरेदी थांबविण्यात आली आहे. परिणामी १५६५ नोंदणीकृत हरभरा उत्पादकांच्या खरेदीचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

अमरावती  ः खरेदी केलेल्या मालाच्या साठवणुकीसाठी गोदाम नसल्याच्या कारणामुळे हरभरा खरेदी थांबविण्यात आली आहे. परिणामी १५६५ नोंदणीकृत हरभरा उत्पादकांच्या खरेदीचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

वरुड येथे शासनाने विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून मार्च महिन्यांत तूर, हरभरा खरेदीस सुरवात केली. वरुड तालुक्‍यात हरभरा विक्रीसाठी १९९८ शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाकडे रीतसर प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी केली. खरेदीची गती संथ असल्याने आजवर यापैकी केवळ ४३६ शेतकऱ्यांचा ५ हजार ३२७ क्‍विंटल ५० किलो इतकाच हरभरा खरेदी होऊ शकला. अद्याप नोंदणीकृत १५६५ शेतकऱ्यांचा हरभरा वेटिंगवर आहे.

राज्यभरात हरभरा साठवणुकीसाठी गोदाम नसल्याने खरेदी थांबविण्यात आल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. नाफेडने ४ हजार ४०० रुपये क्‍विंटल दराने हरभरा खरेदीस सुरवात केली. दरम्यान सुरवातीच्या काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक निकड पाहता ३ हजार रुपये क्‍विंटलने हरभरा खरेदी केला. आता हाच हरभरा ओळखीच्या शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंदणी करून शासनाला ४ हजार ४०० रुपये क्‍विंटलने विकल्या जात असल्याची चर्चा आहे. एकाच सातबारावर हरभरा, तूर, कपाशी, सोयाबीन, ज्वारी अशा पिकाच्या नोंदी असताना त्याच शेतात १० ते १५ क्‍विंटल हरभरा उत्पादन होते तरी कसे, असा प्रश्‍न चर्चीला जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...