शिक्षक मतदारसंघाची ८ जूनला निवडणूक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पुढील महिन्यात आठ जून रोजी निवडणूक होत आहे. उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिक्षकांचा प्रचार सुरू आहे.  कार्यक्रमाच्या निमित्ताने अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यापूर्वीच सुरू झालेली बंडाळी, फाटाफूट, आरोप-प्रत्यारोप, बैठका, जेवणावळी यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षक मतदारसंघासाठी ४९ हजार ५७३ मतदारांनी नोंदणी केली आहे. राज्यातील नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघाची तर कर्नाटक राज्यातील तीन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची ७ जुलैला मुदत संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला. रणरणत्या उन्हात भटारखाने रणरणत्या उन्हात शिक्षकांपर्यंत प्रचारासाठी पोचण्याचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षकांनी दीड महिन्यापासूनच प्रचार सुरू केला आहे. गाठीभेटी, प्रचार बैठका, जेवणावळी सध्या जोरात सुरू आहेत. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापरही केला जात आहे. सुटीमुळे शिक्षक पुढारी जोरात आहेत. सुटीत गावोगावी शिक्षकांना एकत्र जमवून उमेदवारांना आमंत्रित करत मेळावेही होत आहेत. त्यामुळे भटारखाने यापूर्वीच सुरू झाले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com