दुष्काळातही तग धरण्याचे बळ देणारे प्रदर्शन

सेंद्रिय शेतीविषयी मला उत्सुकता आहे. प्रदर्शनात विविध खतांची माहिती मला मिळाली. त्यामुळे सेंद्रिय शेतीचे नियोजन करण्यासाठी मार्ग मिळाले. दुभत्या जनावरांसाठी कडबा तयार करण्याचे यंत्र मला आवडले. ट्रॅक्टरविषयक स्टॉल देखील उत्तम आहेत. - राजेंद्र एकनाथ जाधव, मु. पो. पिशोर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
दुष्काळातही तग धरण्याचे बळ देणारे प्रदर्शन
दुष्काळातही तग धरण्याचे बळ देणारे प्रदर्शन

औरंगाबाद ः ‘अॅग्रोवन’च्या वतीने येथील आयोजित कृषी प्रदर्शनला पहिल्याच दिवसापासून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. तरुण शेतकऱ्यांचा सहभाग मोठा होता. दुष्काळी परिस्थिती असताना शेतीत कशा प्रकारे तग धरता येऊ शकतो, याबाबत विविध उपाययोजना असलेली माहिती येथे मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  या प्रदर्शनातून शेतीला लागणारी अवजारे, बी-बियाणे, खतांबाबत माहिती मिळाली. मी या ठिकाणी शेतीसाठी लागणारे ज्ञान मोफत मिळवले. आपणही आपल्या मित्र शेतकऱ्यांसह या ठिकाणी जाऊन प्रदर्शनातील माहिती घेतली, तर दुष्काळी परिस्थितीतही चांगली शेती कशी करायची, याबाबत ज्ञान मिळू शकते. - गणेश साहेबराव टेकाळे, रासडी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद

मी खास करून हे प्रदर्शन बघायला आलो. मी १२ ते १३ एकर शेती करतो. कापूस, मोसंबी घेतो. या ठिकाणी मला सुधारित तंत्रज्ञान पाहायला मिळाले. ही माहिती शेतकऱ्याला प्रगती साधण्यासाठी बहुउपयोगी आहे.  - संतोष जयसिंग रुणावत , हुशंगपूर, ता. जि. अौरंगाबाद

या ठिकाणी बघण्यासाठी खूपसारी अवजारे आहेत. शेतीत यांत्रीकीकरण करण्यासाठी आवश्यक असलेले साधने आहेत. बी-बियाणे, फळे, सेंद्रिय शेतमाल, तसेच विविध वस्तू ठेवण्यात आलेल्या असल्याने शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी औरंगाबादमध्ये उपलब्ध झालेली आहे. - सुनीता विलास बुरबुले, दैठणा, मु. पो. तीथर्र्पुरी, ता. घनसावंगी, जि. औरंगाबाद

जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त झालोय. आता घरची पाच एकर बागायती शेती पूर्णवेळ करतोय. दहा वर्षांपासून अॅग्रोवनचा वाचक आहे.  अॅग्रोवन कृषी प्रदर्शनामध्ये सायकलचलित कोळपे, फवारणी यंत्र, छोटे ट्रॅक्टर पाहिले. ही कृषी अवजारे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. लवकरच छोटे ट्रॅक्टर खरेदी करणार आहे. येत्या काळात सेंद्रिय शेती करणार आहोत. सेंद्रिय शेतीची माहिती पुस्तिका प्रदर्शनामध्ये मिळाली. विविध कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी अॅग्रोवनच्या प्रदर्शनास शेतक-यांनी भेट दिली पाहिजे. - विजय पाटील , चिंचखेडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव.

माझी दीड एकर शेती आहे. शेतीला पूरक उद्योग म्हणून केळी चिप्स निर्मिती उद्योग सुरू केला आहे. ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनात शेतीपूरक प्रक्रिया उद्योगाची माहिती घेण्यासाठी आलो होतो. दूधप्रक्रिया, अन्नप्रक्रिया उद्योग, तसेच अन्य शेतमाल प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळाली.  - विशाल जावळे, आसोला, ता. जि. परभणी

शेतमालावर प्रक्रिया करून, पॅकिंग,ब्रॅंडिंग करून विक्री केल्यास मूल्यवर्धन होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. ‘अॅग्रोवन’तर्फे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे. मजुरांच्या समस्येवर उपाय म्हणून यांत्रीकीकरण आवश्यक आहे. छोट्या, तसेच मोठ्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी विविध कृषी अवजारे, सेंद्रिय शेतमाल, प्रक्रिया उद्योग, पाणी व्यवस्थापन आदी दालने या प्रदर्शनामध्ये आहेत. शेतकऱ्यांनी प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी. - प्रा. पांडुरंग सत्वधर,  सेवानिवृत्त प्राचार्य, अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि, परभणी. माझ्याकडे दीड एकर शेती आहे. अल्पभूधारक शेतक-यांसाठी उपयुक्त असणारे सायकलचलित फवारणी यंत्र,  टोकण यंत्र, तसेच अन्य अवजारे अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनामध्ये आहेत. अन्य ठिकाणी वेळ वाया घालविण्यापेक्षा कृषी प्रदर्शनासाठी शेतक-यांनी वेळ द्यावा. त्यामुळे नवनवीन कृषी तंत्रज्ञानविषयक माहिती मिळते. - गणेश डाके, ढोरजळगाव, ता. शेवगाव, जि. नगर

माझ्याकडे चाळीस एकर शेती आहे. त्यापैकी ३५ एकर जिरायती, पाच एकरावर लिंबू आणि मोसंबी फळबाग आहे. प्रदर्शनामध्ये विविध अवजारांसोबत ट्रॅक्टर पाहिले. लवकरच ट्रॅक्टर खरेदी करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनातील अनेक बाबी उपयुक्त आहेत. - लक्ष्मण ठोके, कोळी बोडखा, ता. पैठण, जि. औरंगाबाद

औजारांची चांगली माहिती मिळाली. गावाकडे पाण्याची समस्या असली तरी फळबागा आणि आधुनिक सिंचन सामग्रीची माहिती मी घेतली आहे. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना दैनंदिन जिवनातील समस्यांना तोंड देण्याची ताकद मिळते. - विष्णूपंत खरसाडे, मु. पो. बाचेगाव, ता. गेवराई, जि. बीड 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com