नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
ताज्या घडामोडी
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत नगर आघाडीवर
नगर ः शासनाने सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून आतापर्यंत राज्यात ७८ हजार १६७ कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी एक लाख तेरा हजार ३११ शेततळे करण्याचे उद्दिष्ठ होते. पूर्ण झालेल्या कामांचा विचार केला; तर आतापर्यंत ७० टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. त्यात नगर जिल्हा राज्यात आघाडीवर असून, ९ हजार २०० पैकी ८३३० कामे पूर्ण झाली आहेत. नगर नंतर कामे पूर्ण करण्यात औरंगाबाद, नाशिकचा नंबर लागतो.

दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर आता लोकांना पाण्याचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे कमी पाण्यात शेती उत्पादन घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. शेडनेट, पॉलिहाउसमध्ये उत्पादन घेताना शेतकरी ठिंबक सिंचनचा वापर करतात. त्यामुळे पाणी साठवणीसाठी शेतकरी शेततळे करत आहेत. फळपिकांनाही शेततळ्यांचा आधार मिळत आहे.
कमी पाण्यात उत्पादन घेताना ज्यांच्याकडे शेततळे नाही अशा शेतकऱ्यांना त्याचे परिणामही दिसले. प्रत्येक शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने गतवर्षीपासून ‘मागेल त्याला शेततळे‘ योजना सुरू केली. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १ लाख १३ हजार ३११ शेततळे करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले होते. त्यापैकी आतापर्यंत उद्दिष्ठांच्या ७० टक्के म्हणजे ७८ हजार १६७ शेततळ्याची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळे केल्यानंतर ४४ हजार २२६ ठिकाणचे फोटो सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड झाले आहेत.
‘मागेल त्याला शेततळे योजनेतून कामे पूर्ण करण्यावर नगरने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ९ हजार २०० पैकी ८३३० कामे पूर्ण झाली असून, त्याची टक्केवारी ८८ टक्के आहे. त्या पाठोपाठ औरंगाबादने ९ हजार १०० पैकी ६९२० कामे पूर्ण केली असून, त्याची टक्केवारी ७६ आहे. नाशिक जिल्ह्याने ९००० हजारपैकी सहा हजार १०३ कामे पूर्ण केली असून, त्याची टक्केवारी ६८ आहे. शेततळे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध निधीतून टप्प्याटप्प्याने थेट खात्यावर अनुदान दिले जात आहे, असे नगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.