agriculture news in Marathi, agrowon, farmer aggressive for crop insurance | Page 2 ||| Agrowon

खरीप पीकविमाप्रश्नी शेतकरी आक्रमक
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 एप्रिल 2018

परभणी  ः अत्यंत तुटपुंजा खरीप विमा परतावा मंजूर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. सोयाबीनचा विमा हप्ता भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण जोखमीसह प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये विमा परतावा देण्यात यावी. बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान देण्यात यावे, या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी (ता. ९) शनिवार बाजार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

परभणी  ः अत्यंत तुटपुंजा खरीप विमा परतावा मंजूर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. सोयाबीनचा विमा हप्ता भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण जोखमीसह प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये विमा परतावा देण्यात यावी. बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान देण्यात यावे, या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी (ता. ९) शनिवार बाजार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

अल्प आणि अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील खरिपातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट आल्यामुळे जिल्ह्याची खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आली आहे. खरीप पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी संपूर्ण जोखमीसह विमा परतावा मंजूर करणे अपेक्षित असताना रिलायन्स कंपनीने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा हप्त्याएवढीही रक्कम जमा केलेली नाही. पीकविमा संरक्षण घेऊनही अल्प विमापरतावा मिळाल्यामुळे शेतकरी अडचणी सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.  

जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर धरणाचे संरक्षण करण्यात यावे, डिग्रस बंधाऱ्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा, सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, नवीन कर्जवाटप सुरू करण्यात यावे, शेतीपंपांना मोफत वीज देण्यात यावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. 
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य राजन क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, नामदेव गावडे, अॅड. लक्ष्मण काळे, अॅड. माधुरी क्षीरसागर, शिवाजी कदम, केशव आरमळ, नवनाथ कोल्हे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

इतर बातम्या
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...