agriculture news in Marathi, agrowon, Farmer companies will go to court says Thorat | Agrowon

शेतकरी कंपन्या न्यायालयात जाणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे : हमी भावाने धान्य खरेदी करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना नाकारण्यात आले. तसेच बियाणे अनुदानासाठी देखील शासनाने चुकीची भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही न्यायालयात जाणार असल्याची माहिती महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी दिली. 

पुणे : हमी भावाने धान्य खरेदी करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना नाकारण्यात आले. तसेच बियाणे अनुदानासाठी देखील शासनाने चुकीची भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही न्यायालयात जाणार असल्याची माहिती महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी दिली. 

या समस्येवर चर्चा केल्यानंतर न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. किंमत स्थिरीकरण योजनेत कंपन्यांनी चांगले काम केले होते. त्यामुळे किमान हमीभाव योजनेत शेतकरी कंपन्यांना सहभागी करून घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. मात्र, शासनाने सहकारी संस्थांना झुकते माप देत शेतकरी कंपन्यांना दूर ठेवले, असे श्री. थोरात यांचे म्हणणे आहे. 

अभिकर्ता संस्था म्हणजे एजंट म्हणून मान्यता मिळण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ फेडरेशनच्याही आधीच महाएफपीसीने प्रस्ताव ठेवला होता. मात्र, महाएफपीसीला नाकारण्यात आले आहे. शासनाने फक्त जीआर काढून संभ्रम तयार केला. त्यामुळे शेतकरी कंपन्यांचा माल बाजार समित्यांच्या खरेदी केंद्रांवरच पडून आहे. याबाबत स्वतः केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मुख्यमंत्र्यांनीही आश्वासन दिले होते. मात्र, निर्णय झाला नसल्याची टीका  श्री. थोरात यांनी केली.  

शेतकरी कंपन्यांचे खच्चीकरण
बियाणे उत्पादनात देखील शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदानातून डावलण्यात आले आहे. महामंडळाला झुकते माप देत शेतकरी कंपन्यांचे खच्चीकरण करण्यात आले, असा आरोप देखील महाएफपीसीने केला आहे. केंद्र सरकार ऑपरेशन ग्रीनमध्ये शेतकरी कंपन्यांना प्राधान्य देण्याची भाषा करते आणि दुसऱ्या बाजुला राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची हेळसांड होते. त्यामुळे न्यायालयात जाणार असल्याचे श्री.थोरात यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...