agriculture news in Marathi, agrowon, farmer rush at Rahuri Agricultural University campus for Kharif onion seed | Agrowon

राहुरी कृषी विद्यापीठात खरीप कांदा बियाण्यांसाठी झुंबड
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018

राहुरी विद्यापीठ, जि. नगर  : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कांदा पिकाचे पावसाळी खरीप वाण बसवंत-७८० व फुले समर्थ हे बियाणे शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बियाण्यांसाठी नाशिक, धुळे, पुणे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून, काही शेतकरी आदल्या दिवशीपासूनच मुक्कामी आहेत.  

राहुरी विद्यापीठ, जि. नगर  : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कांदा पिकाचे पावसाळी खरीप वाण बसवंत-७८० व फुले समर्थ हे बियाणे शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बियाण्यांसाठी नाशिक, धुळे, पुणे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून, काही शेतकरी आदल्या दिवशीपासूनच मुक्कामी आहेत.  

प्रत्येक शेतकऱ्यास ५ किलो बियाणे देण्यात येत असून, ९०० रुपये प्रतिकिलो बियाणे हा विद्यापीठाचा दर आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी या बियाण्यांकडे पाठ फिरविली होती. मात्र या वर्षी शेतकऱ्यांची गर्दी विद्यापीठास दिलासा देणारी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्राबरोबरच पुणे-नगर रस्त्यावरील चास येथील संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, उद्यान विद्या महाविद्यालय, धुळे, पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्र; तसेच जळगाव येथील संशोधन केंद्रांवरही कांद्याच्या या बियाण्यांच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मधुकर धोंडे यांनी दिली. 

एकूण १२ टन कांदा बियाण्यांची विक्री पहिल्या टप्प्यात सुरू केली असून, राहुरी येथे ४८४३ किलो फुले समर्थचे सत्यप्रत बियाणे व २०३९ किलो फुले बसवंत ७८०च्या बियाण्यांची पहिल्या टप्प्यातील विक्री आजपासून सुरू करण्यात आली. विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी गर्दीचे चोख नियोजन केले होते. मात्र पोलिस संरक्षण वेळेत न मिळाल्याने विद्यापीठाचे नियोजन कोलमडले. शेतकऱ्यांनी विक्री केंद्राचे गेट तोडून विक्री केंद्रांच्या रांगांवर धाव घेतली. यादरम्यान सुरक्षारक्षक दत्तू जाधव जखमी झाले. 

बियाणे भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याचे विद्यापीठाचे अधिकारी वारंवार शेतकऱ्यांना सांगत असतानादेखील शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. विक्रीदरम्यान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी पाहणी केली. बियाणे विभागाचे डॉ. शरद गडाख, डॉ. चंद्रकांत साळुंके, डॉ. केशव कदम, डॉ. मधुकर भालेकर, सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी विक्रीचे नियोजन केले. 

विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी काहीही सुविधा केल्या नाहीत, आम्ही रात्रीपासून येथेच थांबून होतो, सकाळी ९ वाजता अधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर उन्हामध्ये कांदा बियाण्यांची विक्री सुरू करण्यात आली. सकाळी आलेल्या शेतकऱ्यांनी सर्व गोंधळ करून व पोलिसांनी आम्हास पुन्हा रांगेत येण्यासाठी बजावले, विद्यापीठाने टोकण व्यवस्था केली असती, तर इतक्‍या मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडालाच नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. 
 

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...