agriculture news in Marathi, agrowon, farmers Movement for MSP | Agrowon

किसान सेनेचे काट्यांवर बसून आंदोलन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 एप्रिल 2018

बुलडाणा  ः शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किसान सेनेच्या पुढाकाराने मंगळवारी (ता.१०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काट्यांवर बसून अांदोलन करण्यात अाले. या संदर्भात शासनाने दखल न घेतल्यास मंत्रालयात शेतीमाल फेकण्याचा इशारा देण्यात अाला.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हा मेटाकुटीला अाला अाहे. शेतकरी अापल्या शेतातील वांगे, टोमॅटो, कोबी काढून फेकत अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे दर अत्यंत कमी अाहेत. तब्बल तिप्पट फरक अाहे. दुसरीकडे शासकीय खरेदी बंद अाहे.

बुलडाणा  ः शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किसान सेनेच्या पुढाकाराने मंगळवारी (ता.१०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काट्यांवर बसून अांदोलन करण्यात अाले. या संदर्भात शासनाने दखल न घेतल्यास मंत्रालयात शेतीमाल फेकण्याचा इशारा देण्यात अाला.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हा मेटाकुटीला अाला अाहे. शेतकरी अापल्या शेतातील वांगे, टोमॅटो, कोबी काढून फेकत अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे दर अत्यंत कमी अाहेत. तब्बल तिप्पट फरक अाहे. दुसरीकडे शासकीय खरेदी बंद अाहे.

शासकीय खरेदीपूर्वी किंवा त्यादरम्यान खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विकाल असेल तर अशा शेतकऱ्यांना हमीभाव व प्रत्यक्ष विकलेला दर यातील फरकाची रक्कम तत्काळ मिळावी. दूध, भाजीपाला, हरभरा, सोयाबीन, तुरीला अत्यंत कमी भाव अाहे. बुलडाणा जिल्ह्यात १३ पैकी चार केंद्र सुरू अाहेत. बारदाना व जागेअभावी खरेदी केंद्र बंद अाहेत, ते तत्काळ सुरू करावेत. हजारो शेतकऱ्यांच्या घरामध्ये शेतमाल पडून असून तत्काळ खरेदी केली जावी. बोंड अळीच्या नुकसान भरपाईपोटी जाहीर केलेली मदत शासनाकडून तातडीने मिळावी अादी मागण्या करण्यात अाल्या. 

शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या मार्गदर्शनात किसान सेना जिल्हा उपप्रमुख लखन गाडेकर, तालुकाप्रमुख अशोकराव गव्हाणे, प्रवीण निमकर्डे, राजेंद्र गायकवाड, अनिल जगताप, संजय गायकवाड, गजेंद्र दांदडे, शेषराव जगताप, सुमंत इंगळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते अांदोलनात सहभागी झाले होते. 
 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...