agriculture news in Marathi, agrowon, Farmers now we have to fight says Raju Shetti | Agrowon

शेतकऱ्यांनो आता लढायचे ः राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 मे 2018

अर्धापूर, जि. नांदेड (प्रतिनिधी) : सरकारने शेतीविषयी चुकीचे धोरण अवलंबिले. त्यामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी अर्धापूर येथील सभेत मंगळवारी (ता. आठ) केले. 

अर्धापूर, जि. नांदेड (प्रतिनिधी) : सरकारने शेतीविषयी चुकीचे धोरण अवलंबिले. त्यामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी अर्धापूर येथील सभेत मंगळवारी (ता. आठ) केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मराठवाडा, विदर्भ या दुष्काळी भागातील 14 जिल्ह्यांत शेतकरी सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे अर्धापूर शहरात मंगळवारी सकाळी आगमन झाले. खासदार शेट्टी यांची अर्धापूर शहरात बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मारुती मंदिर परिसरातील मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, मराठवाडाध्यक्ष माणिक कदम, जिल्हाआध्यक्ष प्रल्हाद इंगोले आदी उपस्थित होते. 

खासदार शेट्टी म्हाणाले, की शेतीमालाला उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. पण त्यांनी देशातील शेतकऱ्यांची फसवणूक करून विश्वासघात केला. उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणार भाव यात मोठी तफावत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तसेच पंतप्रधान पीकविमा योजना ही शेतकरी कल्याण योजना नसून, काॅर्पोरेट कंपनी कल्याण योजना आहे. स्वमिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी सन्मान वाढविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली, असे प्रतिपादन खासदार शेट्टी यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...