agriculture news in Marathi, agrowon, farmers' strike during one to ten June period | Agrowon

एक ते दहा जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 मे 2018

नाशिक  : सरसकट कर्जमाफी व शेतीलमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून, या संपाच्या शेवटच्या दिवशी १० जून रोजी संपात सहभागी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. 

नाशिक  : सरसकट कर्जमाफी व शेतीलमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून, या संपाच्या शेवटच्या दिवशी १० जून रोजी संपात सहभागी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. 

या संपात नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार असल्याचा विश्वास संपाच्या राष्ट्रीय कोअर कमिटीचे सदस्य संदीप गिड्डे यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमधील हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (ता. २८) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गिड्डे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन करताना या वेळी होणारा देशव्यापी संप पूर्णपणे गनिमी कावा पद्धतीने केला जाणार असल्याचे सांगितले. 

या संपादरम्यान १ जूनपासून शहरातील दूध व भाजीपाला पुरवठा रोखला जाणार असून, संपकाळात शहरातूनही काही खरेदी केली जाणार नाही. शेतकरी भाजीपाला बाजार समित्यांमध्ये न नेता थेट ग्राहकांना ६० रुपये प्रतिकिलो दराने तसेच दूध डेअरीमध्ये न नेता तालुक्याच्या ठिकाणी ५० रुपये लिटरप्रमाणे विकू शकतात, असेही त्यांनी सांगितले. 
जम्मू काश्मीर ते केरळपर्यंत शेतकऱ्यांनी केलेले हे पहिलेच आंदोलन असून, राष्ट्रीय किसान महासंघाच्या १३० व किसान एकता मंचच्या ६० अशा १७० संघटना या देशव्यापी लढ्यात उतरणार असल्याचे गिड्डे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...