जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्याची माहिती माझ्या निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला फोन आल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळ यांना गुरुवारी (ता. १०) केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील ''महाराष्ट्र सदन'' गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. 

भुजबळ म्हणाले, की मला डॉक्टरांनी आराम करण्याच्या अटीवर डिस्चार्ज दिला आहे. लवकरच मी उपचार करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना हजर राहणार आहे. जामीन मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर मला पहिला फोन पवारसाहेबांचा आला. सत्य सर्वांसमोर येईल, ज्यामुळे मला तुरुंगवास झाला. त्या महाराष्ट्र सदनाचा सर्व जण लाभ घेत आहेत, याचा मला आनंद आहे. 

''महाराष्ट्र सदन सुंदर, बनानेवाला अंदर'' असे एक भाजपचाच खासदार बोलला होता. मला सगळ्यांच्याच शुभेच्छा मिळाल्या. २५ वर्षे मी उद्धव ठाकरेंसोबत राहिलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध असतात. पडत्या काळात शिवसेनेने दोन शब्द बोलले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com